Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

iphone : आयफोन 14 मॅक्स आणि प्रो मॅक्सची आणखी वाट पहावी लागणार, काय कारण? जाणून घ्या…

आयफोन 14 मॅक्स आणि आयफोन 14 प्रो मॅक्स लाँच होण्यास विलंबित होण्याची शक्यता आहे.

iphone : आयफोन 14 मॅक्स आणि प्रो मॅक्सची आणखी वाट पहावी लागणार, काय कारण? जाणून घ्या...
iPhoneImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 7:11 AM

नवी दिल्ली : आयफोन (iphone)प्रेमी अनेक दिवसांपासून आयफोन 14 मॅक्स (iPhone 14 Max)आणि आयफोन 14 प्रो मॅक्स (iPhone Pro) लाँच होण्याची वाट पाहत आहेत. मात्र, आता या स्मार्टफोनच्या लाँचिंगची अधिकृत तारीख अद्यापही आलेली नाही. मात्र, लवकरच दोन्ही आयफोन खरेदीसाठी उपलब्ध होतील, असं बोललं जात होतं. आता यावर एक माहिती समोर आली असून टिप डिस्प्ले सप्लाय चेन कन्सल्टंट्सचे सीईओ रॉस यंग यांच्या एका ट्विटनुसार आयफोन 14 मॅक्स आणि आयफोन 14 प्रो मॅक्स लाँच होण्यास विलंबित होण्याची शक्यता आहे. आयफोन लाँच होण्याबाबत काही अफवाही पसरल्या होत्या.  Appleचे  नवे आयफोन एकाच वेळी लाँच होतील, असंही बोललं गेलं होतं. मात्र, आता आयफोन 14 मॅक्स आणि आयफोन 14 प्रो मॅक्स लॉँचची वाट पाहणाऱ्यांना आणखी वाट पहावी लागू शकते.

आयफोनसंदर्भात महत्वाचं ट्विट

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Asian News International (@ani_trending)

याआधी GSM Arenaनं एका अहवालात म्हटलं होतं की, Appleनं iPhone 14 स्क्रीन तयार करण्यासाठी चीनी स्मार्टफोन डिस्प्ले मेकर BOE सोबत करार केला आहे. चीनी कंपनी फक्त 6.1-इंच पॅनेल तयार करेल. याचा अर्थ असा आहे की मोठे iPhone 14 Max आणि iPhone Pro अजूनही सॅमसंग आणि LG द्वारे निर्मित स्क्रीन वापरतील.

स्क्रीनचा आकार किती?

iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max चा स्क्रीन आकार किती याविषयी देखील उत्सुकता लागून आहे.  Appleनं अर्थातच आगामी स्मार्टफोनचे तपशील शेअर केलेले नाहीत. पण. टिप डिस्प्ले सप्लाय चेन कन्सल्टंट्सचे सीईओ रॉस यंग यांनी केलेल्या ट्विटनुसार, iPhone 14 Pro ला 6.12-इंच स्क्रीन मिळेल. ही iPhone 13 Pro च्या 6.06-इंच स्क्रीनपेक्षा मोठी आहे. याशिवाय iPhone 14 Pro Max मध्ये 6.69-इंच स्क्रीन उपलब्ध असेल. ही iPhone 13 Pro Max च्या 6.68-इंच स्क्रीनपेक्षा मोठी असेल.

iPhone 15 आणि iPhone 15 Max

Apple iPhone 15 आणि iPhone 15 Max स्मार्टफोनला iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro स्मार्टफोन्सप्रमाणेच स्क्रीन देऊ शकते. यासोबतच Apple आपल्या आगामी स्मार्टफोनमध्ये इतरही अनेक बदल करणार आहे.

A16 Bionic चिप

iPhone 14 Pro स्मार्टफोनशी संबंधित इतर लीक्सनुसार Apple iPhone 14 Pro स्मार्टफोनमध्ये नेक्स्ट जनरेशन A16 Bionic चिप देऊ शकते. A15 Bionic चिप iPhone 14 Pro Max मध्ये येण्याची शक्यता आहे. ही सध्या iPhone 13 आणि iPhone SE मध्ये दिली आहे. तसेच, या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 120Hz प्रोमोशन डिस्प्ले मिळू शकतो जो अपग्रेड केलेल्या लाइटिंग कनेक्टरसह जोडला जाईल.

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.