आयफोन 14 प्रो घेणं परवडत नाही! उत्पादन खर्च वाचून बोलाल हा तर बजेट फोन

आयफोन 14 घेण्याची इच्छा आहे, पण खिसा पाहिलं मनं मारावं लागतं. पण खरंच आयफोन 14 प्रो इतका महाग आहे का? हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. कारण एका मार्केट रिसर्चरनं दिलेल्या अहवालात त्याबाबतची माहिती उघड करण्यात आली आहे.

आयफोन 14 प्रो घेणं परवडत नाही! उत्पादन खर्च वाचून बोलाल हा तर बजेट फोन
आयफोन 14 प्रो तयार करण्यासाठी येतो इतका खर्च, किंमत वाचून बसेल आश्चर्याचा धक्का
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 9:03 PM

मुंबई : अ‍ॅपलनं गेल्या वर्षी आयफोन 14 सीरिज लाँच केली होती. कंपनीने आयफोन 14, आयफोन 14 प्लस, आयफोन 14 प्रो आणि आयफोन 14 प्रो मॅक्स लाँच केला आहे. आयफोन बाळगणं एक स्टेटस सिम्बॉल म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे तरुण मंडळी कायम आपल्याकडे आयफोन असावा यासाठी आग्रही असतात. इतर कंपन्याचे फोनदेखील तितक्याच ताकदीचे आहे. पण आयफोन तो आयफोन अशी समज झाली आहे. मात्र या सीरिजची किंमत पाहता तुम्हाला तुमचा प्लान वारंवार बदलावा लागला असेल. कधी कधी एखादी ऑफर मिळाली तर क्षणाचाही विलंब न करता आयफोन खरेदी करणं शक्यही झालं असेल.अनेकदा क्रेडीट आणि एक्सचेंज ऑफरमुळे आयफोन स्वस्तात उपलब्ध होतो. मात्र प्रत्येकवेळी ऑफर मिळेलच असं नाही. पण तुम्हाला जर सांगितलं की तुम्ही महागडा म्हणून समजत असलेला फोन नेमका किती रुपयात बनतो. तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण खरंच तुम्ही त्याची किंमत वाचाल तर आश्चर्याचा धक्का बसेल.

मार्केट रिसर्चर काउंटरपॉइंटने दिलेल्या अहवालानुसार, आयफोन 14 प्रो तयार करण्यासाठी 464 डॉलर म्हणजेच 38400 रुपये खर्च येतो.आयफोन 13 प्रोच्या तुलनेत उत्पादन खर्च 3.7 टक्के जास्त आहे. आयफोन 13 प्रो 2021 मध्ये लाँच करण्यात आला होता. तेव्हा आयफोन 13 प्रोची किंमत 1,19,900 रुपयांपासून होती. आयफोन 14 ची किंमत वाढण्यामागचं कारण म्हणजे नवा प्रोसेसर आणि कॅमेरा मॉड्युल हे आहे. या फोनच्या कॅमेरा सेटअपमध्ये 48 एमपी प्रायमरी कॅमेरा आहे.आयफोन 14 प्रोची किंमत 1,29,900 रुपयांपासून सुरु होते. आयफोन 14 प्रो बेस व्हेरियंटची ही किंमत 128 जीबी इंटरनल मेमरीसाठी आहे.

iPhone 14 Pro फीचर्स

आयफोन 14 प्रो 206 ग्रामचा आहे.आयफोन 14 प्रोमध्ये 6.1 इंचाची ओएलईडी डिस्प्ले आहे. तसेच सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आहे. त्यासोबत 120 एचझेड रिप्रेश रेटही मिळतो.आयपी68 रेटिंग असल्याने वॉटर आणि डस्ट रेसिस्टेंट आहे. या फोनमध्ये ए 16 चिप आहे. त्याचबरोबर 16 कोर न्युरल इंजिन मिळतं.या फोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप आहे. 48 एमपीचा प्रायमरी कॅमेरा, 12 एमी अल्ट्रा वाइड कॅमेरासह 12 एमपीचे दोन टेलिफोटो कॅमेरा फ्लॅश लाईट दिले आहेत. हा फोन 4 के फॉर्मेटला सपोर्ट करतो. आयफोन 14 प्रो 128 जीबी, आयफोन 14 प्रो 128 जीबी, आयफोन 14 प्रो 512 जीबी आणि आयफोन 14 प्रो 1 टीबी इंटरनल स्टोरेज असलेले वेगवेगळे मॉडेल आहेत.आयफोन 14 प्रो पर्पल, सिल्व्हर, गोल्ड आणि ब्लॅक रंगात उपलब्ध आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.