मुंबई : अॅपलनं गेल्या वर्षी आयफोन 14 सीरिज लाँच केली होती. कंपनीने आयफोन 14, आयफोन 14 प्लस, आयफोन 14 प्रो आणि आयफोन 14 प्रो मॅक्स लाँच केला आहे. आयफोन बाळगणं एक स्टेटस सिम्बॉल म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे तरुण मंडळी कायम आपल्याकडे आयफोन असावा यासाठी आग्रही असतात. इतर कंपन्याचे फोनदेखील तितक्याच ताकदीचे आहे. पण आयफोन तो आयफोन अशी समज झाली आहे. मात्र या सीरिजची किंमत पाहता तुम्हाला तुमचा प्लान वारंवार बदलावा लागला असेल. कधी कधी एखादी ऑफर मिळाली तर क्षणाचाही विलंब न करता आयफोन खरेदी करणं शक्यही झालं असेल.अनेकदा क्रेडीट आणि एक्सचेंज ऑफरमुळे आयफोन स्वस्तात उपलब्ध होतो. मात्र प्रत्येकवेळी ऑफर मिळेलच असं नाही. पण तुम्हाला जर सांगितलं की तुम्ही महागडा म्हणून समजत असलेला फोन नेमका किती रुपयात बनतो. तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण खरंच तुम्ही त्याची किंमत वाचाल तर आश्चर्याचा धक्का बसेल.
मार्केट रिसर्चर काउंटरपॉइंटने दिलेल्या अहवालानुसार, आयफोन 14 प्रो तयार करण्यासाठी 464 डॉलर म्हणजेच 38400 रुपये खर्च येतो.आयफोन 13 प्रोच्या तुलनेत उत्पादन खर्च 3.7 टक्के जास्त आहे. आयफोन 13 प्रो 2021 मध्ये लाँच करण्यात आला होता. तेव्हा आयफोन 13 प्रोची किंमत 1,19,900 रुपयांपासून होती. आयफोन 14 ची किंमत वाढण्यामागचं कारण म्हणजे नवा प्रोसेसर आणि कॅमेरा मॉड्युल हे आहे. या फोनच्या कॅमेरा सेटअपमध्ये 48 एमपी प्रायमरी कॅमेरा आहे.आयफोन 14 प्रोची किंमत 1,29,900 रुपयांपासून सुरु होते. आयफोन 14 प्रो बेस व्हेरियंटची ही किंमत 128 जीबी इंटरनल मेमरीसाठी आहे.
आयफोन 14 प्रो 206 ग्रामचा आहे.आयफोन 14 प्रोमध्ये 6.1 इंचाची ओएलईडी डिस्प्ले आहे. तसेच सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आहे. त्यासोबत 120 एचझेड रिप्रेश रेटही मिळतो.आयपी68 रेटिंग असल्याने वॉटर आणि डस्ट रेसिस्टेंट आहे. या फोनमध्ये ए 16 चिप आहे. त्याचबरोबर 16 कोर न्युरल इंजिन मिळतं.या फोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप आहे. 48 एमपीचा प्रायमरी कॅमेरा, 12 एमी अल्ट्रा वाइड कॅमेरासह 12 एमपीचे दोन टेलिफोटो कॅमेरा फ्लॅश लाईट दिले आहेत. हा फोन 4 के फॉर्मेटला सपोर्ट करतो. आयफोन 14 प्रो 128 जीबी, आयफोन 14 प्रो 128 जीबी, आयफोन 14 प्रो 512 जीबी आणि आयफोन 14 प्रो 1 टीबी इंटरनल स्टोरेज असलेले वेगवेगळे मॉडेल आहेत.आयफोन 14 प्रो पर्पल, सिल्व्हर, गोल्ड आणि ब्लॅक रंगात उपलब्ध आहे.