iPhone 15 Plus : असा आहे आयफोन 15 प्लसचा परफॉर्मन्स, खरेदी करण्याआधी जाणून घ्या रिव्हीव्यू
स्पेक्सबद्दल बोलायचे झाले तर आयफोन 15 मध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले आहे तर कंपनीने आयफोन 15 प्लसमध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. दोन्ही मोबाईल फोनमध्ये तुम्हाला A16 Bionic चिपसेटचा सपोर्ट मिळतो जो कंपनीने गेल्या वर्षी आयफोन 14 प्रो मॉडेल्समध्ये दिला होता.

मुंबई : आयफोन 15 प्लसचा वाजागाजा करत लाँन्चींग केल्यानंतर (iPhone 15 Plus) आयफोन 15 प्रो (iPhone 15 Pro) नेमका कसा आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आयफोन प्रेमींमध्ये पाहायला मिळतेय. अॅपलने कॅलिफोर्नियातील अॅपलने मुख्यालयाच्या ‘स्टीव्ह जॉब्स थिएटर’मधून आयफोन 15 आणि 15 प्लस जागतिक स्तरावर लॉन्च केले आहेत. अॅपलच्या इतिहासात प्रथमच दोन्ही स्मार्टफोन 48MP प्राथमिक कॅमेरा सह लॉन्च करण्यात आले आहेत. याचा अर्थ असा की ही पहिलीच वेळ आहे की कंपनी कोणत्याही सीरिजच्या बेस मॉडेलमध्ये 48MP कॅमेरा देत आहे. दोन्ही फोन यूएसबी टाइप सी-चार्जिंग पोर्ट आणि मोठी बॅटरी देतात.
किती आहे किंमत?
किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, अॅपलने आयफोन 15 चा 128GB प्रकार 799 डॉलर्समध्ये आणि आयफोन 15 प्लस चा 128GB प्रकार 899 डॉलर्समध्ये लॉन्च केला आहे. भारतीय रुपयांमध्ये, हे 66,195 आणि 74,480 रुपयांना लॉन्च केले गेले आहेत. लक्षात ठेवा, भारतीय किंमत कंपनीने अद्याप सामायिक केलेली नाही. आयफोन 15 आणि 15 प्लसच्या प्री-ऑर्डर 15 सप्टेंबरपासून सुरू झाली तुम्ही तो अॅपलच्या अधिकृत वेबसाइट, अॅमेझॉन आणि अॅपल स्टोअरवरून खरेदी करू शकाल.
स्पेसीफिकेशन्स
स्पेक्सबद्दल बोलायचे झाले तर आयफोन 15 मध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले आहे तर कंपनीने आयफोन 15 प्लसमध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. दोन्ही मोबाईल फोनमध्ये तुम्हाला A16 Bionic चिपसेटचा सपोर्ट मिळतो जो कंपनीने गेल्या वर्षी आयफोन 14 प्रो मॉडेल्समध्ये दिला होता. फोटोग्राफीसाठी, दोन्ही फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये मुख्य कॅमेरा 48MP आहे तर दुसरा 12MP पोर्ट्रेट कॅमेरा आहे जो कमी प्रकाशात चांगले कार्य करतो. समोर तुम्हाला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 12MP कॅमेरा मिळेल. दोन्ही मॉडेल्समध्ये दुसऱ्या पिढीची अल्ट्रा-वाइडबँड चिप आहे, त्यामुळे तुम्ही तुमची Apple डिव्हाइसेस सहजपणे शोधू शकता.




सध्या तरी कंपनीने बॅटरीबाबत कोणतेही अपडेट दिलेले नाही. अॅपलने म्हटले आहे की दोन्ही मॉडेल्सची बॅटरी ‘दिवसभर’ असेल. याआधी लीक्समध्ये असे म्हटले होते की कंपनी आयफोन 15 आणि 15 प्लसमध्ये 3,877 mAh आणि 4,912 mAh बॅटरी देऊ शकते.