Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

iPhone 15 Pro : आयफोन 15 देतोय का चटके? ग्राहकांच्या नाराजीने ‘तापमान’ वाढले

iPhone 15 Pro : आयफोन 15 Pro सह मॅक्समध्ये ओव्हरहिटिंगचा मुद्दा सध्या गाजत आहे. ग्राहकांनी याविषयीच्या तक्रारी केल्या आहेत. त्यांच्या मते, मोबाईल अधिक गरम होत आहे. अर्थात यामागील कारणं अद्याप स्पष्ट झाली नाहीत, पण तज्ज्ञांनी काही अंदाज वर्तविले आहेत.

iPhone 15 Pro : आयफोन 15 देतोय का चटके? ग्राहकांच्या नाराजीने 'तापमान' वाढले
Follow us
| Updated on: Sep 28, 2023 | 9:28 AM

नवी दिल्ली | 28 सप्टेंबर 2023 : ॲप्पलच्या iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max मध्ये युझर्सला ओव्हरहिटिंगची समस्या (Overheating Issue) जाणवत आहे. सध्या या स्मार्टफोनची जगभरात क्रेझ आहे. भारतात तर दाम जादा असतानाही चाहत्यांच्या स्टोअरबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आयफोन खिशात रुबाबात दिसावा यासाठी काही जण दुसऱ्या शहरातून मुंबई, दिल्लीत दाखल झाले आहेत. पण नव्या दमाच्या दोन मॉडेल्सबाबत ग्राहकांनी तक्रारीचा सूर आळवला आहे. मोबाईल गरम होत असल्याची तक्रार करण्यात येत आहे. ग्राहकांच्या नाराजीनंतर तज्ज्ञांनी या स्मार्टफोनमधील काही बदलांमुळे ही समस्या आल्याचे भाकित केले आहे. त्यावर आता काय उपाय शोधण्यात येईल, हे लवकरच समोर येईल.

तज्ज्ञांचे मत काय

TF सिक्युरिटीजचे तज्ज्ञ मिंग-ची कुओ यांनी याविषयी मत नोंदवले आहे. त्यांच्या मते, Apple च्या iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max या मॉडेलमध्ये ही समस्या दिसून येत आहे. अंतर्गत डिझाईनमधील बदलाचा हा परिणाम आहे. हे बदल ग्राहकांची नाराजी ओढावत आहे. याविषयी ॲप्पलची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

हे सुद्धा वाचा

चिप कंपनीवर खापर नको

मिंग-ची कुओ यांनी या समस्येचे खापर तैवान कंपनीवर फोडण्याची गरज नसल्याचे सांगितले. याविषयी केलेल्या सर्व्हेनुसार ओव्हरहिटिंगची समस्या काही मॉडेल्समध्ये दिसून येत आहे. तैवान सेमीकंडक्टर मॅन्यूफॅक्चरिंग कंपनी (TSMC) यांच्या चिपची यामध्ये कोणतीच भूमिका नाही. काही तज्ज्ञांनी याच कंपनीच्या A17 Pro Chip वर बोट ठेवले आहे.

हे आहे कारण

तज्ज्ञांच्या मते नवीन आयफोन गरम होण्यामागे या मॉडेलमध्ये करण्यात आलेले अंतर्गत बदल हा आहे. डिझाईनमधील बदल त्यासाठी कारणीभूत ठरला आहे. ॲप्पलने थर्मल डिझाईनचा वापर केल्याने हँडसेट गरम होत आहे. त्यामुळे ग्राहकांना त्याचे चटके सहन करावे लागत आहे. अर्थात याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

किती वाढले तापमान

काही युझर्सने या दोन मॉडेल्सचे तापमान किती वाढले, याची माहिती समोर आणली आहे. त्यांनी याविषयीचे व्हिडिओ तयार करुन ते युट्यूबला अपलोड केले आहेत. त्यातील दाव्यानुसार, या नवीन समस्येमुळे आयफोनचे तापमान 46 डिग्री सेल्सिअसने वाढले आहे.

'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला
'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला.
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.