मुंबई : iQOO ने iQOO Quest Days सेलची घोषणा केली आहे ज्यामध्ये स्मार्टफोन निर्माती कंपनी त्याच्या स्मार्टफोनच्या किंमतींवर सूट आणि इतर ऑफर देत आहे. सेल दरम्यान, iQOO स्मार्टफोनच्या खरेदीदारांना Amazon कूपनद्वारे फोनवर 3,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकेल. iQOO क्वेस्ट डेज सेल सोमवारी 13 डिसेंबरपासून सुरू झाला आहे आणि 16 डिसेंबर 2021 म्हणजेच गुरुवारपर्यंत सुरू राहील. (IQOO Quest Days Sale on Amazon : iQOO smartphones available with huge discounts)
सेल दरम्यान, ब्रँडचे लोकप्रिय स्मार्टफोन्स त्यांच्या टॉप-ऑफ-द-लाइन iQOO 7 सिरीजसह iQOO Z5 आणि iQOO Z3 भारतात डिस्काऊंटसह खरेदीसाठी उपलब्ध असतील. चला तर मग जाणून घ्या iQOO क्वेस्ट डेज सेलअंतर्गत iQOO च्या कोणकोणत्या स्मार्टफोन्सवर किती रुपयांचा डिस्काऊंट मिळेल.
iQOO 7 आणि iQOO 7 Legend दोन्ही किरकोळ विक्रीवर सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. Amazon स्टोअरला भेट दिल्यावर असे दिसून येते की iQOO 7 चे बेस मॉडेल 29,990 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे, जे त्याची मूळ किरकोळ किंमत 31,990 रुपयांपेक्षा कमी आहे. या फोनवर 2,000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. या फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज पर्याय उपलब्ध आहे.
iQOO क्वेस्ट डेज सेल अंतर्गत iQOO 7 Legend च्या बेस व्हेरिएंटची किंमत 36,990 रुपये आहे. या फोनची मूळ किंमत 39,990 रुपये आहे. म्हणजेच या फोनच्या किमतीवर 3,000 रुपयांची सूट दिली जात आहे. या सर्व सवलती Amazon कूपनद्वारे उपलब्ध आहेत ज्या Amazon India वेबसाइटवरील प्रोडक्ट पेजवर रिडीम केल्या जाऊ शकतात. खरेदीदारांनी कूपन डिस्काउंटच्या शेजारी बॉक्स चेक करणे आवश्यक आहे.
सवलती व्यतिरिक्त, ग्राहक iQOO 7 आणि iQOO 7 Legend वर नो-कॉस्ट EMI चा पर्यायदेखील निवडू शकतात. iQOO 7 वर 9 महिने नो कॉस्ट EMI चा पर्याय उपलब्ध आहे आणि iQOO 7 Legend वर 12 महिने नो कॉस्ट EMI चा पर्याय आहे.
iQOO लाइनअपवरील एंट्री पर्याय, iQOO Z3 iQOO Quest Days सेल दरम्यान 2,000 रुपयांच्या सवलतीनंतर 17,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह स्मार्टफोनच्या स्टेप-अप व्हेरिएंटवरही हाच कूपन डिस्काउंट लागू केला जाऊ शकतो. iQOO Z3 5G चे ग्राहक 9 महिन्यांपर्यंत फोनवर नो-कॉस्ट EMI पर्यायाचा लाभ घेऊ शकतील.
इतर बातम्या
iPhone 14 Pro मध्ये 48MP कॅमेरा आणि 8GB RAM मिळणार, जाणून घ्या कसा असेल नवीन स्मार्टफोन
Xiaomi चं Redmi Watch 2 Lite स्मार्टवॉच बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
(IQOO Quest Days Sale on Amazon : iQOO smartphones available with huge discounts)