डुअल कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह 10 हजार रुपयांच्या रेंजमध्ये iQoo U5x बाजारात, जाणून घ्या फीचर्स

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी आयक्यूने (iQoo) नुकताच एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनचे नाव आयक्यू यू5एक्स (iQOO U5x) आहे. यापूर्वी, कंपनीने डिसेंबरमध्ये 5G कनेक्टिव्हिटी आणि स्नॅपड्रॅगन 695 SoC सह आयक्यू यू5 (iQOO U5) लाँच केला होता.

डुअल कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह 10 हजार रुपयांच्या रेंजमध्ये iQoo U5x बाजारात, जाणून घ्या फीचर्स
iQoo U5xImage Credit source: IQoo
Follow us
| Updated on: Mar 27, 2022 | 5:15 PM

मुंबई : चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी आयक्यूने (iQoo) नुकताच एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनचे नाव आयक्यू यू5एक्स (iQOO U5x) आहे. यापूर्वी, कंपनीने डिसेंबरमध्ये 5G कनेक्टिव्हिटी आणि स्नॅपड्रॅगन 695 SoC सह आयक्यू यू5 (iQOO U5) लाँच केला होता. यासह, कंपनीने नुकतेच ‘X’ लाइनअपमध्ये नवीन मॉडेल लॉन्च केले आहे. मात्र, हा फोन 5G नेटवर्कला सपोर्ट करत नाही. iQOO U5x मध्ये फ्रंट कॅमेऱ्यासाठी डिस्प्लेच्या वरच्या बाजूला वॉटरड्रॉप नॉचसह 6.51-इंचाचा IPS LCD डिस्प्लेदेखील आहे. फोनमध्ये 720×1600 पिक्सेलचा HD+ रिझोल्यूशन डिस्प्ले आहे. स्मार्टफोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशो 89% आहे. स्मार्टफोन इंडस्ट्री स्टँडर्ड 60Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. फोन दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो ज्यामध्ये पोलर ब्लू आणि स्टार ब्लॅक या रंगांचा समावेश आहे.

  1. iQOO U5x ची किंमत : iQOO U5x चीनमध्ये दोन स्टोरेज पर्यायांसह सादर करण्यात आला आहे. 4GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची किंमत CNY 849 म्हणजेच जवळपास 10,200 रुपये इतकी आहे. 8GB रॅम आणि 128GB ऑनबोर्ड स्टोरेज असलेल्या दुसऱ्या मॉडेलची किंमत CNY 1,049 आहे म्हणजेच अंदाजे 12,600 रुपये आहे.
  2. iQOO U5x चं डिझाइन: डिव्हाइसमध्ये पॉली कार्बोनेट बॉडी आहे आणि ब्रँड हा फोन दोन रंगांच्या पर्यायांमध्ये ऑफर करत आहे. ब्रँडने आपला iQOO U5x हा नवीन बजेट 4G स्मार्टफोन म्हणून देशात सादर केला आहे. हँडसेटच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास iQOO U5x मध्ये कंपनीच्या स्वतःच्या iQoo Z6 5G तसेच Vivo T1 5G मध्ये बरेच साम्य आहे, जे नुकतेच भारतात लॉन्च झाले होते.
  3. iQOO U5x चे स्पेसिफिकेशन्स : iQOO U5x च्या फ्रंट कॅमेऱ्यासाठी याच्या वरच्या बाजूला वॉटरड्रॉप नॉचसह 6.51 इंचाचा IPS LCD देण्यात आला आहे. डिस्प्ले 720×1600 पिक्सेलचे HD+ रिझोल्यूशन देतो. स्मार्टफोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशो 89% आहे. स्मार्टफोन इंडस्ट्री स्टँडर्ड 60Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. iQOO U5x क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 680 चिपसेटसह सुसज्ज आहे.
  4. iQOO U5x चे सेफ्टी फीचर्स : स्मार्टफोनमध्ये सुरक्षेसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरसह AI फेस अनलॉक आहे.
  5. iQOO U5x कॅमेरा : iQOO U5x मध्ये मागील बाजूस रेक्टँग्युलर कॅमेरा मॉड्यूल आहे ज्यामध्ये ड्युअल-कॅमेरा सेटअप आहे. स्मार्टफोनमध्ये 13MP प्रायमरी लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. डिव्हाइसच्या पुढील भागात मध्यभागी वॉटरड्रॉप नॉच शैलीसह 8MP सेल्फी कॅमेरा आहे.
  6. iQOO U5x ची बॅटरी: हा फोन 5,000mAh बॅटरी पॅकसह येतो आणि मायक्रो-USB पोर्टद्वारे 10W चार्जिंगला सपोर्ट करतो.

इतर बातम्या

150W अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास

Apple Down : ॲपलच्या सेवा ठप्प, App Store, Music सह अनेक ॲप्सवर परिणाम

क्वाड कॅमेरा सेटअपसह Samsung चा 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.