Apple iPhone 15 : आयफोन 15 खरा की बनावट, बॉक्समधील हे फीचर उघडणार रहस्य
Apple iPhone 15 : इतका महागडा आयफोन खरेदी करताना काळजी घेणे तर आवश्यक आहे. नाहीतर कळलं की महागडा आयफोन 15 खरेदी केला नी तो बनावट निघाला, मग काय अवस्था होईल नाही का? तर यावर एक उपाय आहे. हा नामी उपाय तुम्हाला आयफोन फेक आहे की खरा हे समोर आणेल.
नवी दिल्ली | 24 सप्टेंबर 2023 : स्कॅम आणि फेक प्रॉडक्ट मिळण्याच्या वार्ता काही कमी नाहीत. त्यामुळे iPhone 15 घेताना सावधगिरी बाळगणे आणि एक पाऊल पुढे असणे आवश्यक आहे. इतका महागडा स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर तो बनावट निघाला तर, नुकसान ठरलेलेच. iPhone 15 ची धडाक्यात विक्री सुरु झाली आहे. काहीजण ऑनलाईन पण हा स्मार्टफोन मागवत आहेत. तर काही ठगबाज, सायबर अपराधी पण सक्रीय झाले आहेत. स्वस्तात आयफोन विक्रीसाठी अनेक लिंक पण व्हायरल होत आहे. त्यामुळे तुमच्या हातात पण नकली, खोटा, बनावट आयफोन (Fake iPhone 15) येऊ शकतो. तेव्हा काळजी घेणे आवश्यक आहे. आयफोन खरेदीपूर्वी आणि त्याची घरपोच डिलिव्हरी झाल्यानंतर खरे-खोटेपणा तपासता येतो, या स्टेप्समुळे ही प्रक्रिया सोपी झाली आहे.
Retail Box मध्ये लपलंय हे फीचर
iPhone 15 Series Retail Box मध्ये एक खास फीचर देण्यात आले आहे. यामध्ये ॲप्पलने एक खास सुरक्षेचे फीचर जोडले आहे. त्यामुळे मोबाईल खरेदीपूर्वी हे फीचर जरुर तपासा. ट्विटरवर याविषयीची एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये एक व्यक्ती आयफोन 15 च्या रिटेल बॉक्सवर युवी लाईटच्या मदतीने होलोग्राम दाखवताना दिसत आहे.
The boxes of the new iPhone 15 are equipped with a security system that displays holograms under a UV light. This is a measure introduced by Apple to recognize real boxes and prevent people from being scammed pic.twitter.com/oBhQoc5IDI
— Majin Bu (@MajinBuOfficial) September 21, 2023
इतर पण पर्याय
तुम्हाला आयफोन बनावट, खोटा असल्याची शंका असल्यास पडताळा करता येतो. त्यासाठी बॉक्सवर दिलेला सीरियल क्रमांक अथवा IMEI क्रमाक आयफोनच्या सेटिंग ॲपवर जाऊन तपासता येईल. स्मार्टफोनच्या मागील बाजूस सर्वात खाली दिलेला टेक्स्ट तपासता येतो. सिम ट्रेवर पण IMEI क्रमांक लिहिलेला असतो. या आधारे आयफोन बनावट की खरा हे समोर येते.
होलोग्राम लपवला
हा स्मार्टफोन खरेदी करताना Apple ID लॉग-इन करा. हा स्मार्ट फोन क्लोन असेल तर ॲप्पल आयडी लॉग-इन होणार नाही. त्यामुळेच आयफोन 15 सीरीजच्या रिटेल बॉक्सवर होलोग्राम लपवून ठेवण्यात आला आहे. त्याआधारे तुम्हाला आयफोनचा खरे खोटेपणा समोर येतो.
इस्त्रोच्या NavIC चा वापर
इस्त्रोच्या NavIC चा नवीन आयफोनमध्ये वापर करण्यात आला आहे. 2018 मध्ये इस्त्रोने NavIC भारतात लाँच केले होते. ही एक भारतीय स्टँडअलोन नॅव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टम आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना अवघ्या काही वेळात त्याच्या आजुबाजूच्या परिसराची, ठिकाणांची अचूक माहिती मिळेल. हे जीपीएस एकूण 7 सॅटेलाईट आणि ग्राऊंड स्टेशनच्या नेटवर्कचा वापर करुन एक खास डिझाईन तयार करण्यात येते. त्याआधारे वापरकर्त्यांना प्रवासात मदत मिळेल.