मुंबई : भारतात प्रीमियम-अफोर्डेबल व्हिजन सिरीजच्या मोठ्या यशानंतर, भारतातील विश्वासू स्मार्टफोन ब्रँड itel ने मंगळवारी एक इनोवेटिव नेक्स्ट-जनरेशन स्मार्टफोन – Vision 2S लाँच केला आहे. या फोनची किंमत 6,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. या लॉन्चसह, itel ने नवीन युगातील ग्राहकांची आवड पूर्ण करण्यासाठी अत्यंत स्वस्त किंमतीत उत्कृष्ट स्मार्टफोन एक्सपीरियन्स देण्याचे आपले वचन पूर्ण केले आहे. (Itel Vision 2S launched With 5000mAh Battery, Android 11, know Price, Specifications)
Transsion India चे सीईओ अरिजीत तलपात्रा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “आज नवीन ग्लोबल व्यवस्थेत स्मार्टफोनचा वापर अनेक पटीने वाढला आहे, कारण ग्राहक त्यांच्या मोबाईलवर जास्त वेळ घालवत आहेत. हे लक्षात घेऊन, प्रीमियम डिझाईन आणि सर्वोत्तम श्रेणीतील वैशिष्ट्यांसह, व्हिजन 2 एस पॉवर-पॅक बॅटरीसह येतो जेणेकरून ग्राहकांचा स्मार्टफोनचा अनुभव सुसह्य होईल
व्हिजन 2S मध्ये दमदार फीचर्स
- लिव्ह लाइफ बिग साईझ म्हणून सेट, व्हिजन 2 एस मध्ये 5000 एमएएच बॅटरी पॅक देण्यात आली आहे. प्रीमियम मोठा इमर्सिव्ह 6.5-इंच एचडी+ आयपीएस वॉटरड्रॉप डिस्प्लेदेखील देण्यात आला आहे.
- स्मार्टफोन प्रीमियम डिझाइन आणि टेक्नोलॉजिकली लेटेस्ट फीचर्ससह एआय-सक्षम व्हिजन कॅमेरा, फेस अनलॉक आणि सिक्युरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सर, लेटेस्ट अँड्रॉइड ओएस, फास्ट प्रोसेसरने सुसज्ज आहे.
- स्मार्टफोन एका विशेष व्हीआयपी ऑफरसह येतो, जेथे ग्राहक कोणतेही सेवा शुल्क न भरता खरेदीच्या 100 दिवसांच्या आत या फोनची स्क्रीन तुटली/फुटली तर ती विनामूल्य बदलून घेऊ शकतो.
- इमर्सिव आणि ब्राइट व्हिडिओ पाहण्यासाठी यात 1600 x 720 पिक्सेल रिझोल्यूशन देण्यात आलं आहे.
- लेटेस्ट एआय पॉवर मास्टर इंटेलिजेंट आणि ऑटोमॅटिक पॉवर मॅनेजमेंट ऑफर करते जे पॉवर-सेव्हिंग मोड, स्लीप मोड, अॅप्लिकेशन पॉवर मॅनेजमेंट, अॅप्लिकेशन अॅक्टिव्हेशन, एआय स्क्रीन लाइट मॅनेजमेंट आणि मॅक्सिमम आउटपुट ऑफर करण्यासाठी बॅटरी वाचवण्यास ऑटोमॅटिकली मदत करते.
- फोनच्या मागील बाजूस, स्मार्टफोन 8 मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सरसह ड्युअल एआय कॅमेरासह सुसज्ज आहे. तसेच यात एआय ब्यूटी मोडसह सेल्फीसाठी 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. जो कमी प्रकाशात चांगले फोटो काढण्यास सक्षम आहे.
- नवीन अँड्रॉइड 11 (गो एडिशन) ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारा व्हिजन 2 एस मल्टीटास्किंगसाठी 1.6GHz ऑक्टा-कोर प्रोसेसरद्वारे सपोर्टेड आहे.
- फोन 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटर्नल स्टोरेजसह येतो. फोन अनलॉक करण्यासाठी फास्ट फेस अनलॉक आणि मल्टी फीचर फिंगरप्रिंट सेन्सर सारख्या ड्युअल सिक्युरिटी फीचर्ससह बाजारात लॉन्च करण्यात आला आहे.
- डिव्हाइस तीन ग्रेडिएंट टोनमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये ग्रेडेशन पर्पल, ग्रेडेशन ब्लू आणि डीप ब्लू या रंगांचा समावेश आहे.
- नवीन स्मार्टफोन इन-सेल टेक्नोलॉजीसह 6.5 इंच HD+ वॉटरड्रॉप आणि 2.5D वक्र कर्व्ड फुली लॅमिनेटेड डिस्प्लेसह सुसज्ज आहे.
इतर बातम्या
किफायतशीर किंमतीत प्रीमियम लूक, ढासू डिझाईन, जबरदस्त फीचर्ससह नवीन स्मार्टवॉच बाजारात
5G लाँचिंगनंतरही देशात 4G चा दबदबा कायम राहणार, Ookla च्या अहवालात मोठा खुलासा
Realme 9 सिरीज झाली टीज, पुढच्या आठवड्यात फोनच्या स्पेसिफिकेशनबाबत होईल खुलासा
(Itel Vision 2S launched With 5000mAh Battery, Android 11, know Price, Specifications)