स्मार्ट फीचरसह ‘JBL’चे नवे हेडफोन लाँच, किंमत आणि फीचर
JBL ने नवीन सीरिजसह 5 हेडफोनची लाँचिंग केली आहे. JBL LIVE 100 पाहिले तर या हेडफोनला कंपनीने सिग्नेचर साऊंडसह लाँच केले आहे आणि यामध्ये अॅल्यूमिनिअम फिनिशिंग दिली आहे.
मुंबई : JBL ने भारतात आज (12 जून) नवीन हेडफोन सीरिज JBL LIVE लाँच केले आहेत. या हेडफोनच्या किमतीची सुरुवात 2 हजार 499 रुपयांपासून आहे. ग्राहक हे हेडफोन रिटेल स्टोअर आणि JBL ई-शॉपवर खरेदी करु शकतात.
नवीन सीरिजसह 5 हेडफोनची लाँचिंग करण्यात आली आहे. JBL LIVE 100 पाहिले तर या हेडफोनला कंपनीने सिग्नेचर साऊंडसह लाँच केले आहे आणि यामध्ये अॅल्यूमिनिअम फिनिशिंग दिली आहे. कंपनीने याची किंमत 2 हजार 499 रुपये ठेवली आहे. तसेच ब्लूटूथ इनबिल्ड JBL LIVE 200BT हेडफोन एक नेकबँड पॅटर्नचा इन-ईअर हेडफोन आहे. यामध्ये स्पीड चार्ज टेक्नॉलॉजीसह 10 तासांची बॅटरी क्षमता दिली आहे. कंपनीने या हेडफोनची किंमत 5 हजार 299 रुपये ठेवली आहे.
या सीरिजमधील तिसरा हेडफोन JBL LIVE 400BT आहे. या हेडफोनची किंमत तब्बल 7 हजार 899 रुपये आहे. या हेडफोनला अनेक शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. ऑन-ईअर हेडफोनचे फीचर्स पाहिले तर, गुगल असिस्टंट, अलेक्सा कनेक्टिव्हिटी, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, स्पीड चार्ज टेक्नोलॉजीसोबत 24 तासांची बॅटरी क्षमता, टच कंट्रोल, अॅल्यूमिनिअम फिनिशिंग दिली आहे आणि माय JBL हेडफोन अॅप मिळणार. यामध्ये विशेष म्हणजे एंबीयंट नॉईस कंट्रोल करण्यासाठी एंबीयंट अव्हेयर फीचर आणि हेडफोन न काढता बोलण्यासाठी टॉक-थ्रूही देण्यात आला आहे.
JBL LIVE 500BT मध्ये LIVE 400BT प्रमाणे फीचर दिले आहेत. या हेडफोनची डिझाईन अराऊंड-ईअरसारखी आहे आणि यामध्ये 30 तासापर्यंत बॅटरी क्षमता दिली आहे आणि किंमत 9 हजार 999 रुपये आहे.
JBL LIVE 650BTNC हेडफोनची किंमत 12 हजार 599 रुपये दिली आहे. यामध्ये अराऊंड-ईअर डिझाईन आहे. तसेच टच कंट्रोल आणि अॅल्यूमिनिअम फिनिशिंग दिली आहे. तसेच इतर हेडफोनप्रमाणे यामध्येही सेम फीचर दिले आहेत.