जिओचा ‘फुल पैसा वसूल’ नवीन प्लॅन; फक्त या किंमतीत मिळवा 10 OTT ॲपसह डेटाचा लाभ
आता वेगवेगळ्या OTT ॲप्सवर पैसे खर्च करण्याची गरज नाही, कारण आता तुम्हाला फक्त एवढ्या रुपयांमध्ये 10 OTT ॲप्स मिळू शकतात. फक्त OTT ॲप्सच नाही तर तुम्हाला डेटा देखील दिला जाईल, हा कोणता प्लॅन आहे आणि या प्लॅनची वैधता किती आहे? चला त्याबद्दल जाणून घेऊयात...

Jio OTT Plan:आपल्यापैकी अनेकजण नवीन वेब सिरीज आणि चित्रपट पाहाण्याचे खूप शौकीन असतात. ज्यामुळे तुम्ही दरमहा हजारो रुपये खर्च करून वेगवेगळ्या ओटीटी ॲप्सचे सबस्क्रिप्शन खरेदी करता. पण तुम्हाला आता हजारो रूपये खर्च करावे लागणार नाहीये कारण आज आम्ही तुमच्यासाठी एक स्वस्त प्लॅन शोधला आहे जो तुम्हाला एक, दोन किंवा तीन नव्हे तर 10 ओटीटी ॲप्सचा मोफत आनंद देईल. तर मुकेश अबांनी यांनी हा प्लॅन त्यांच्या ग्राहकांसाठी आणला असून जिओ युजर्सला या प्लॅनचा फायदा घेता येणार आहे. तर या प्लॅनची किंमत फक्त 175 रुपये आहे, या प्लॅनमध्ये नेमके कोण कोणते फायदे उपलब्ध आहेत ते जाणून घेऊया.
या प्लॅनमध्ये तुम्हाला किती डेटा मिळतो?
175 रुपयांच्या या प्लॅनमध्ये कंपनी तुम्हाला 10 जीबी हाय-स्पीड डेटा देखील देत आहे. परंतु लक्षात ठेवा की जर डेटा मर्यादा संपली तर स्पीड 64 केबीपीएस पर्यंत कमी होईल.
जिओ 175 रूपयांच्या प्लॅनची वैधता
रिलायन्स जिओचा हा 175 रुपयांचा प्लॅन किती काळ चालेल? हा प्रश्न आता तुमच्या मनात येत असेल? कंपनीच्या अधिकृत साइटवर दिलेल्या माहितीनुसार, या प्लॅनसह 28 दिवसांची वैधता दिली जाते. याचा अर्थ असा की तुम्ही खाली नमूद केलेल्या OTTॲप्सचा आनंद 28 दिवसांसाठी घेऊ शकाल.





(फोटो क्रेडिट- जियो डॉट कॉम)
जिओ 175 प्लॅन ओटीटी ॲप्सची यादी
या प्लॅनमध्ये कोणत्या ओटीटी ॲप्सना मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे ते आपण जाणून घेऊयात. जर तुम्ही हा प्लॅन खरेदी केला तर रिलायन्स जिओ तुम्हाला Z5, Sony Liv, Discovery Plus, Planet Marathi, Lionsgate Play, Chaupal, Kancha Lanka, Hoichoi, Jio TV आणि Sun Next सारख्या OTT ॲप्सचा मोफत ॲक्सेस देईल.

(फोटो क्रेडिट- जियो डॉट कॉम)
प्लॅनमध्ये या सुविधा उपलब्ध नसतील
या 175 रुपयांच्या जिओ प्लॅनमध्ये तुम्हाला मोफत अमर्यादित कॉलिंग किंवा एसएमएसची सुविधा मिळणार नाही, कारण हा एक डेटा पॅक आहे. पण जर तुम्हाला कॉलिंग, एसएमएस आणि ओटीटी सारख्या डेटासह सर्वकाही हवे असेल तर कंपनीकडे 445 रुपयांचा प्लॅन आहे.
या प्लॅनमध्ये, तुम्हाला दररोज 2 जीबी डेटा, कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि वर नमूद केलेल्या सर्व ओटीटी ॲप्सचा मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. एवढेच नाही तर, या योजनेत 50 जीबी मोफत एआय क्लाउड स्टोरेजचा लाभ देखील मिळतो.