Jio नंतर Airtel चे ही रिचार्जही महागले, पाहा काय आहेत नवीन दर

| Updated on: Jun 28, 2024 | 5:35 PM

जिओने गुरुवारी आपल्या पोस्टपेड आणि प्रीपेड प्लानमध्ये वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर शुक्रवारी एअरटेलने ही प्लानच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे दोन्ही कंपनीच्या ग्राहकांना फटका बसणार आहे. ही वाढ ३ जुलै पासून लागू होणार आहे.

Jio नंतर Airtel चे ही रिचार्जही महागले, पाहा काय आहेत नवीन दर
Follow us on

Airtel vs Jio : एअरटेलने आपल्या यूजर्सना धक्का दिला आहे. कारण एअरटेलने प्रीपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही प्लानच्या किमतीत वाढ केली आहे. जिओने किंमती वाढवल्यानंतर एअरटेलने ही घोषणा केली आहे. टॅरिफ दरात 15 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी रिलायन्स जिओनेही प्लॅनची ​​किंमत वाढवण्याची घोषणा केली आहे.

एअरटेल आणि जिओ या दोन्ही कंपन्यांच्या प्लॅनच्या नवीन किमती 3 जुलैपासून लागू होणार आहे. एअरटेलने प्लॅनच्या किंमतीत थोडीशी वाढ केली आहे, परंतु फायद्यांवर कोणताही परिणाम होणार नाही. कारण पूर्वीच्या योजनांमध्ये जे फायदे मिळत होते. ते अजूनही या प्लॅनमधील युजर्सना दिले जाणार आहेत.

Reliance Jio नंतर Bharti Airtel ही भारतातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार ऑपरेटर कंपनी आहे. एअरटेलने मोबाईल टॅरिफ 10% -21% ने वाढवण्याची घोषणा केली आहे. सुनील भारती मित्तल यांच्या टेलिकॉम कंपनीने सांगितले की ते 3 जुलै 2024 पासून सुधारीत दर लागू होणार आहेत.

किमती किती वाढल्या?

179 रुपयांच्या प्लॅनऐवजी तुम्हाला 199 रुपये द्यावे लागतील.
फायदे- 2 GB डेटा
अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएस
वैधता – 28 दिवस

1799 च्या प्लान ऐवजी तुम्हाला 1999 रुपये द्यावे लागतील
फायदे- 24GB डेटा
अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएस
वैधता- 365 दिवस

जुन्या किंमती नव्या किंमती डेटा वैधता
179 199 2GB 28
455 509 6GB 84
1799 1999 24GB 365
265 299 1GB/Day 28
299 349 1.5GB/Day 28
359 409 2.5GB/Day 28
399 449 3GB/Day 28
479 579 1.5GB/Day 56
2999 3599 2GB/Day 365

एअरटेलने सांगितले की, भारतातील दूरसंचार कंपन्यांसाठी आर्थिकदृष्ट्या मजबूत व्यवसाय मॉडेल सक्षम करण्यासाठी ही वाढ करण्यात आलीये. एंट्री लेव्हल प्लॅनमध्ये दररोज 70 पैशांनी वाढ करत आहोत.

एअरटेलचे शेअर्स घसरले

एअरटेलच्या रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ झाल्यानंतर त्याचे शेअर्स विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत. आधी त्याने 1,536 च्या पातळीला स्पर्श केला. नंतर तो खाली आला आणि 1.82% च्या घसरणीसह 1,449 रुपयांवर बंद झाला. या वर्षी स्टॉक 43% वाढला आहे.

पूर्ण आर्थिक वर्ष 2024 साठी एअरटेलचा एकत्रित नफा 10.52% ने घसरून ₹7,467 कोटी झाला. आर्थिक वर्ष 2023 मध्ये नफा 8,345 कोटी रुपये होता.

एक दिवसाआधीच रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड योजनांच्या किमती 15% ते 25% वाढवण्याची घोषणा केली होती. आता 239 रुपयांचा प्लॅन 299 रुपयांना मिळणार आहे. सर्वात स्वस्त प्लॅन 155 रुपयांचा होता, जो 189 रुपयांना आता मिळणार आहे.