Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jio-Airtel ग्राहकांच्या खिशाला बसणार झळ?; महागडा होऊ शकतो रिचार्ज प्लॅन

Jio-Airtel Recharge : जिओ आणि एअरटेल, त्यांच्या ग्राहकांना तगडा झटका देऊ शकतात. दोन्ही कंपन्यांचे रिचार्ज प्लॅन येत्या काही दिवसात महाग होण्याची दाट शक्यता आहे. टेलिकॉम इंडस्ट्रीत सर्वात मोठी वाढ डिसेंबर 2021 मध्ये दिसून आली होती. आता दोन्ही कंपन्या 15-17 टक्के वाढ करण्याची दाट शक्यता आहे.

Jio-Airtel ग्राहकांच्या खिशाला बसणार झळ?; महागडा होऊ शकतो रिचार्ज प्लॅन
टेरिफ प्लॅनची दरवाढ होणार?
Follow us
| Updated on: Apr 13, 2024 | 2:02 PM

दूरसंचार कंपन्यांमध्ये प्राईस वॉर दिसू शकते. ग्राहकांना या दरवाढीचा मोठा फटका बसू शकतो. त्यांनी रिचार्जसाठी जादा पैसा मोजावा लागू शकतो. टेलिकॉम कंपन्यांनी गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून त्यांच्या संपूर्ण प्लॅनसंदर्भात कोणतीही मोठी वाढ केलेली नाही. डिसेंबर र 2021 मध्ये सर्वात मोठी दरवाढ झाली होती. त्यानंतर आता जिओ आणि एअरटेल या कंपन्या त्यांच्या टेरिफ प्लॅनमध्ये 15-17 टक्के वाढ करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही दरवाढ कधीपासून लागू होईल, हे मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

लोकसभा निवडणुकीनंतर वाढ

अनेक भागात कंपन्या 5G सेवा देण्याचा दावा करतात. पण तरीही त्यांनी प्लॅनमध्ये मोठा बदल केलेला नाही. पण आता या कंपन्या टेरिफ प्लॅनमध्ये 15-17 टक्के वाढ करण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीनंतर हा दरवाढ लागू होण्याचा अंदाज Antique Stock Broking या संस्थेने वर्तवला आहे. भारती एअरटेलसह जिओत ही दरवाढ लागू होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

2021 च्या अखेरीस दणका

  1. PTI च्या वृत्तानुसार, डिसेंबर 2021 मध्ये टेरिफ प्लॅनमध्ये 20 टक्के वाढ झाली होती. भारती एअरटेल तिचे ARPU मध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनी आर्थिक वर्ष 2027 पर्यंत सरासरी महसूल आधारे ग्राहकांना 208 रुपयांहून 286 रुपयांपर्यंत वाढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
  2. 2G वरुन 4G वर आलेल्या कंपन्या या सर्व प्रक्रियेचा खर्च ग्राहकांवर टाकण्याच्या तयारीत आहेत. अनेक ठिकाणी 5G च्या नावाखाली कंपन्या 4G सेवा पुरवित आहेत, त्याबद्दल या कंपन्या ब्र सुद्धा काढत नाहीत. पण आता खर्चाचे कारण पुढे करत कंपन्या टेरिफ प्लॅन वाढविण्याची शक्यता आहे. अर्थात एकाही दूरसंचार कंपनीने या विषयीची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
  3. Antique Stock Broking च्या अंदाजानुसार, जिओ, एअरटेल आणि इतर टेलिकॉम कंपन्या वेगवान इंटरनेटसाठी वेगळा रिचार्ज प्लॅन बाजारात आणतील. 5G सेवेच्या नावाखाली ग्राहकांच्या खिशाला फटका बसू शकतो. तर कमी किंमतीत 4G सेवा देण्याचा कंपन्यांचा विचार असल्याचे समोर येत आहे. अर्थात कोणत्याही टेलिकॉम कंपनीने याविषयीची अधिकृत माहिती दिलेले नाही. हा केवळ एक अंदाज आहे.
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.