IPL चे सर्व सामने मोफत पाहा, ‘ही’ कंपनी देतेय सर्वात स्वस्त Hotstar प्लॅन

तुम्हाला जर IPL चे सर्व सामने तुमच्या मोबाईलवर पाहायचे असतील तर यासाठी तुम्हाला Disney+ Hotstar चं व्हीआयपी सब्सक्रिप्शन घ्यावं लागेल, ज्याची किंमत 399 रुपये इतकी आहे.

IPL चे सर्व सामने मोफत पाहा, 'ही' कंपनी देतेय सर्वात स्वस्त Hotstar प्लॅन
Follow us
| Updated on: Apr 10, 2021 | 6:40 PM

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2021 (Indian Premier League 2021) स्पर्धा सुरू झाली आहे. तुम्हाला जर IPL चे सर्व सामने तुमच्या मोबाईलवर पाहायचे असतील तर यासाठी तुम्हाला Disney+ Hotstar चं व्हीआयपी सब्सक्रिप्शन घ्यावं लागेल, ज्याची किंमत 399 रुपये इतकी आहे. परंतु आज आम्ही एक असा मार्ग सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही विनामूल्य आयपीएलच्या सर्व सामन्यांचा आनंद घेऊ शकता, तसेच यात तुम्हाला विनामूल्य डेटा, कॉलिंग आणि एसएमएसची सुविधादेखील मिळू शकेल. (Jio and airtel giving best disney hotstar plan for ipl fans, know everything about it)

आजकाल सर्व टेलिकॉम कंपन्यांनी असे प्लॅन्स सादर केले आहेत, ज्यात आपल्याला अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि एसएमएससह Disney+ Hotstar चं मोफत व्हीआयपी सब्सक्रिप्शन दिलं जातं. परंतु तुम्हाला माहिती आहे का, की Disney+ Hotstar सह कोणत्या कंपनीने बेस्ट ऑफर सादर केली आहे. तुम्हाला माहिती नसेल तर काळजी करु नका, आज आम्ही तुम्हाला भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांच्या Disney+ Hotstar सह कॉलिंग आणि डेटा प्लॅन्सची माहिती देणार आहोत. तसेच कोणता प्लॅन बेस्ट आहे, हेदेखील सांगणार आहोत.

Jio चे Disney+ Hotstar प्लॅन्स

आयपीएलदरम्यान रिलायन्स जियोने (Reliance Jio) आपल्या युजर्ससाठी काही खास प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनअंतर्गत, प्रत्येक युजर कुठेही बसून आयपीएलच्या प्रत्येक सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहू शकतो. जियोच्या प्रीपेड प्लॅन युजर्सना 401 रुपयांमध्ये हॉटस्टारचं व्हीआयपी सब्सक्रिप्शन दिलं जात आहे. जियोने 400 रुपयांपासून ते 2599 रुपयांपर्यंत वेगवेगळे प्लॅन्स सादर केले आहेत. ज्यामध्ये युजर्सना हॉटस्टारचं सब्सक्रिप्शन मिळेल. आयपीएलच्या सर्व सामन्यांचे ओटीटी राईट्स हॉटस्टारकडे असल्याने आयपीएलचे सर्व सामने हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहेत.

Jio चा 401 रुपयांचा प्लॅन

Jio च्या या प्लॅनमध्ये युजर्सना 28 दिवसांसाठी 90GB डेटा दिला जात आहे. ज्यामध्ये दररोज 3 जीबी डेटा आणि अॅडिशनल 6 जीबी डेटा दिला जात आहे. दैनिक डेटा संपल्यानंतर युजर्स 64 Kbps च्या इंटरनेट स्पीडवर अनलिमिटेड इंटरनेट वापरु शकतात. सोबत युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे.

Jio चा 598 रुपयांचा प्लॅन

Jio च्या या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2 जीबी डेटा मिळेल. दैनिक डेटा संपल्यानंतर युजर्स 64 Kbps च्या इंटरनेट स्पीडवर अनलिमिटेड इंटरनेट वापरु शकतात. या प्लॅनची वैधता 56 दिवसांची आहे. सोबत युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे.

Jio चा 777 रुपयांचा प्लॅन

Jio च्या या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 1.5 जीबी डेटा मिळेल. दैनिक डेटा संपल्यानंतर युजर्स 64 Kbps च्या इंटरनेट स्पीडवर अनलिमिटेड इंटरनेट वापरु शकतात. तसेच कंपनीने या प्लॅनमध्ये युजर्सना 5 जीबी अॅडिशनल डेटा दिला आहे. या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. सोबत युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे.

Jio चा 2599 रुपयांचा प्लॅन

Jio च्या या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2 जीबी डेटा मिळेल. दैनिक डेटा संपल्यानंतर युजर्स 64 Kbps च्या इंटरनेट स्पीडवर अनलिमिटेड इंटरनेट वापरु शकतात. तसेच कंपनीने या प्लॅनमध्ये युजर्सना 10 जीबी अॅडिशनल डेटा दिला आहे. या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. सोबत युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे.

या प्लॅन्समध्ये कंपनीने युजर्सना Disney+ Hotstar सह JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud चं मोफत सब्सक्रिप्शन दिलं आहे.

Airtel चे Disney+ Hotstar प्लॅन्स

आयपीएलदरम्यान एअरटेलने (Airtel) आपल्या युजर्ससाठी एक खास प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनअंतर्गत, प्रत्येक युजर कुठेही बसून आयपीएलच्या प्रत्येक सामन्याची थेट प्रक्षेपण पाहू शकतो. एअरटेलच्या प्रीपेड प्लॅन युजर्सना 401 रुपयांमध्ये हॉटस्टारचं व्हीआयपी सब्सक्रिप्शन दिलं जात आहे. एअरटेलने 400 रुपयांपासून ते 2698 रुपयांपर्यंत वेगवेगळे प्लॅन्स सादर केले आहेत. ज्यामध्ये युजर्सना हॉटस्टारचं सब्सक्रिप्शन मिळेल. आयपीएलच्या सर्व सामन्यांचे ओटीटी राईट्स हॉटस्टारकडे असल्याने आयपीएलचे सर्व सामने हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहेत.

Airtel चा 401 रुपयांचा प्लॅन

Airtel चा 401 रुपयांचा प्लॅन जर तुम्ही घेतलात तर तुम्हाला यामध्ये दररोज 3 जीबी डेटा मिळेल. सोबत डिज्नी प्लस हॉटस्टारचं व्हीआयपी सब्सक्रिप्शनदेखील दिलं जाईल. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची असेल.

Airtel चा 448 रुपयांचा प्लॅन

Airtel चा 448 रुपयांचा प्लॅन जर तुम्ही घेतलात तर तुम्हाला यामध्ये दररोज 3 जीबी डेटा मिळेल. सोबत डिज्नी प्लस हॉटस्टारचं व्हीआयपी सब्सक्रिप्शनदेखील दिलं जाईल. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची असेल. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची आणि दररोज 100 एसएमसएसची सुविधादेखील मिळेल.

Airtel चा 599 रुपयांचा प्लॅन

Airtel चा 599 रुपयांचा प्लॅन जर तुम्ही घेतलात तर तुम्हाला यामध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळेल. सोबत डिज्नी प्लस हॉटस्टारचं व्हीआयपी सब्सक्रिप्शनदेखील दिलं जाईल. या प्लॅनची वैधता 56 दिवसांची असेल. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची आणि दररोज 100 एसएमसएसची सुविधादेखील मिळेल.

Airtel चा 2698 रुपयांचा प्लॅन

Airtel चा 2698 रुपयांचा प्लॅन जर तुम्ही घेतलात तर तुम्हाला यामध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळेल. सोबत डिज्नी प्लस हॉटस्टारचं व्हीआयपी सब्सक्रिप्शनदेखील दिलं जाईल. या प्लॅनची वैधता 356 दिवसांची असेल. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची आणि दररोज 100 एसएमसएसची सुविधादेखील मिळेल.

सामने कसे पाहायचे?

एरटेलचा यापैकी कोणताही प्लॅन तुम्ही घेतलात तर तुम्हाला डिज्नी प्लस हॉटस्टारचं व्हीआयपी सब्सक्रिप्शन मिळेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये डिज्नी प्लस हॉटस्टारचं अॅप डाऊनलोड करावं लागेल. त्यानंतर तुम्ही तुमचा फोन नंबर आणि ओटीपी टाकून तुमचं सब्सक्रिप्शन अॅक्टिव्हेट करु शकता. सब्सक्रिप्शन अॅक्टिव्हेट केल्यानंतर तुम्ही हॉटस्टारवर आयपीएलचे सर्व सामने मोफत पाहू शकता.

संबंधित बातम्या

CSK vs DC IPL 2021 | गुरु धोनी शिष्य रिषभ पंत आमनेसामने, स्टंपमागील कॉमेंट्री ऐकायला मजा येणार, रवी शास्त्रीचं हटके ट्विट

IPL 2021 : पहिली मॅच नाही तर चॅम्पियनशीप जिंकणं महत्त्वाचं, रोहितने रणशिंग फुकलं!

(Jio and airtel giving best disney hotstar plan for ipl fans, know everything about it)

Non Stop LIVE Update
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.