खुशखबर! Jio कडून मोफत 10GB डेटासह IPL सामने पाहण्याची संधी, जाणून घ्या काय आहे ऑफर

तुम्हाला जर IPL चे सर्व सामने तुमच्या मोबाईलवर पाहायचे असतील तर यासाठी तुम्हाला Disney+ Hotstar चं व्हीआयपी सब्सक्रिप्शन घ्यावं लागेल, ज्याची किंमत 399 रुपये इतकी आहे.

खुशखबर! Jio कडून मोफत 10GB डेटासह IPL सामने पाहण्याची संधी, जाणून घ्या काय आहे ऑफर
Follow us
| Updated on: Apr 15, 2021 | 10:23 PM

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2021 (Indian Premier League 2021) स्पर्धा सुरू झाली आहे. तुम्हाला जर IPL चे सर्व सामने तुमच्या मोबाईलवर पाहायचे असतील तर यासाठी तुम्हाला Disney+ Hotstar चं व्हीआयपी सब्सक्रिप्शन घ्यावं लागेल, ज्याची किंमत 399 रुपये इतकी आहे. परंतु आज आम्ही एक असा मार्ग सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही विनामूल्य आयपीएलच्या सर्व सामन्यांचा आनंद घेऊ शकता, तसेच यात तुम्हाला विनामूल्य डेटा, कॉलिंग आणि एसएमएसची सुविधादेखील मिळू शकेल. (Jio giving best disney hotstar plan for ipl fans, know everything about it)

जियो त्यांच्या ग्राहकांना 2021 क्रिकेट हंगाम साजरा करण्यासाठी विनामूल्य डेटा आणि डिस्ने + हॉटस्टारचं विनामूल्य सबस्क्रिप्शन देत आहे. ही ऑफर केवळ जियो प्रीपेड प्लॅन्सवर लागू आहे. टेलिकॉम ऑपरेटर कंपनीने एक नवीन Jio क्रिकेट अ‍ॅप देखील बाजारात आणलं आहे, जे JioPhone च्या सर्व युजर्ससाठी विनामूल्य उपलब्ध आहे. अ‍ॅप कंपनीच्या म्हणण्यानुसार, जिओफोन युजर्सना स्कोअर अपडेट तपासण्यास, क्विझमध्ये भाग घेण्यास आणि बक्षिसे जिंकण्याची संधी दिली जाते. चला तर मग विनामूल्य डेटा आणि हॉटस्टार ऑफर मिळवण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या…

आयपीएलदरम्यान रिलायन्स जियोने (Reliance Jio) आपल्या युजर्ससाठी काही खास प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनअंतर्गत, प्रत्येक युजर कुठेही बसून आयपीएलच्या प्रत्येक सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहू शकतो. जियोच्या प्रीपेड प्लॅन युजर्सना 401 रुपयांमध्ये हॉटस्टारचं व्हीआयपी सब्सक्रिप्शन दिलं जात आहे. जियोने 400 रुपयांपासून ते 2599 रुपयांपर्यंत वेगवेगळे प्लॅन्स सादर केले आहेत. ज्यामध्ये युजर्सना हॉटस्टारचं सब्सक्रिप्शन मिळेल. आयपीएलच्या सर्व सामन्यांचे ओटीटी राईट्स हॉटस्टारकडे असल्याने आयपीएलचे सर्व सामने हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहेत.

Jio चा 401 रुपयांचा प्लॅन

Jio च्या या प्लॅनमध्ये युजर्सना 28 दिवसांसाठी 90GB डेटा दिला जात आहे. ज्यामध्ये दररोज 3 जीबी डेटा आणि अॅडिशनल 6 जीबी डेटा दिला जात आहे. दैनिक डेटा संपल्यानंतर युजर्स 64 Kbps च्या इंटरनेट स्पीडवर अनलिमिटेड इंटरनेट वापरु शकतात. सोबत युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे.

Jio चा 598 रुपयांचा प्लॅन

Jio च्या या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2 जीबी डेटा मिळेल. दैनिक डेटा संपल्यानंतर युजर्स 64 Kbps च्या इंटरनेट स्पीडवर अनलिमिटेड इंटरनेट वापरु शकतात. या प्लॅनची वैधता 56 दिवसांची आहे. सोबत युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे.

Jio चा 777 रुपयांचा प्लॅन

Jio च्या या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 1.5 जीबी डेटा मिळेल. दैनिक डेटा संपल्यानंतर युजर्स 64 Kbps च्या इंटरनेट स्पीडवर अनलिमिटेड इंटरनेट वापरु शकतात. तसेच कंपनीने या प्लॅनमध्ये युजर्सना 5 जीबी अॅडिशनल डेटा दिला आहे. या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. सोबत युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे.

Jio चा 2599 रुपयांचा प्लॅन

Jio च्या या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2 जीबी डेटा मिळेल. दैनिक डेटा संपल्यानंतर युजर्स 64 Kbps च्या इंटरनेट स्पीडवर अनलिमिटेड इंटरनेट वापरु शकतात. तसेच कंपनीने या प्लॅनमध्ये युजर्सना 10 जीबी अॅडिशनल डेटा दिला आहे. या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. सोबत युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे.

या प्लॅन्समध्ये कंपनीने युजर्सना Disney+ Hotstar सह JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud चं मोफत सब्सक्रिप्शन दिलं आहे.

इतर बातम्या

जिओचे 150 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंतचे धमाकेदार प्लॅन, विनामूल्य कॉलिंगसह बंपर डेटा

बजेट फोन शोधताय? तुमच्यासाठी Oppo चा नवा स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स

जोडीदार शोधताय? नवा डेटिंग अ‍ॅप, चॅट ऐवजी थेट व्हिडीओ कॉल करा, मनातलं सगळं मळभ बाहेर काढा

(Jio giving best disney hotstar plan for ipl fans, know everything about it)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.