699 रुपयात जिओ फोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी, ऑफरमध्ये मुदत वाढ
रिलायन्स जिओफोनवर मिळणाऱ्या ऑफरमध्ये एक मिहन्यांची मुदत वाढ (Jio phone increase diwali offer) करण्यात आली आहे.
मुंबई : रिलायन्स जिओफोनवर मिळणाऱ्या ऑफरमध्ये एक मिहन्यांची मुदत वाढ (Jio phone extended diwali offer) करण्यात आली आहे. आता इच्छुक ग्राहक नोव्हेंबरपर्यंत जिओफोन डिस्काऊंटमध्ये खरेदी (Jio phone extended diwali offer) करु शकता. गेल्या महिन्यात सुरु झालेल्या या ऑफरच्या माध्यमातून जिओ फोन 699 रुपयांत उपलब्ध केला जात आहे.
कंपनी जिओफोनवर 801 रुपयांची सूट देत आहे. त्याशिवाय 693 रुपयांचा डाटा बेनिफिट देत आहे. हा फोन कंपनीने 1500 रुपये किंमतीत लाँच केला होता.
काय ऑफर आहे
जिओ फोन दिवाळी 2019 ऑफरप्रमाणे 699 रुपयात खरेदी करु शकतात. जिओफोनच्या मूळ किंमतीवर 801 रुपयांची सूट दिल्यामुळे हा फोन 699 रुपयात मिळत आहे. जिओफोनच्या खरेदीवर 693 रुपयांचे अॅडिशनल बेनिफिटही दिले जात आहे. यामध्ये कंपनी युजर्सला इंटरनेट डाटाही देत आहे. हा डाटा 99 रुपयांसह रिचार्जमध्ये क्रेडिट केला जाईल.
जिओ फोनला दिवाळी ऑफरमध्ये गेल्या तीन आठवड्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे जिओनेही ऑफरमध्ये एक महिन्यांची मुदत वाढ करण्याचा निर्णय घेतला. जे युजर्स जिओ मुव्हमेंटचा भाग बनले होते ते युजर्स यावेळी जिओ डिजिटल लाईफसोबत जोडू शकता.
जिओ फोन स्पेसिफिकेशन्स
जिओ फोनमध्ये 2.4 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. फोन 1.2GHz ड्युअल प्रोसेसर आणि 512MB रॅमसह आहे. KaiOS सिस्टमवर काम करणारा हा फोन 4 जीबी च्या इंटरनल स्टोअरेजसह येतो. गरज पडल्यास फोनची इंटरनल मेमरी 128 जीबीपर्यंतही तुम्ही वाढवू शकता. जिओ फोनची विशेष गोष्ट ही आहे की, यामध्ये फेसबुक, गुगल मॅप्स, व्हॉट्सअॅप आणि यूट्यूब प्रोलोडेड मिळते. फोनमध्ये 2000mAh बॅटरी क्षमता दिलेली आहे.