जिओ विरुद्ध व्हीआयचं प्राइस वॉर, कोण देत आहेत सर्वात स्वस्त इंटरनेट प्लॅन
जिओ आणि व्होडाफोनच्या 365 दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनमध्ये सर्वात स्वस्त इंटरनेट आणि अनलिमिटेड कॉलिंग कोण देत आहे. जर तुम्ही जिओ किंवा व्हीआय युजर असाल तर तुलना पाहून हा प्लॅन खरेदी करा. यामुळे तुम्हाला आणखी अनेक फायदे मिळू शकतात.
तुमच्याकडे जर जिओ किंवा व्होडाफोन नंबर असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. कारण या दोन्ही टेलिकॉम कंपन्या त्यांचे ग्राहक टिकवण्यासाठी एकापेक्षा एक प्लॅन ऑफर करत आहेत. तसेच युजर्ससाठी या दोन्ही कंपन्या मासिक योजनांपासून वार्षिक योजनांपर्यंत ऑफर देत आहेत. या ऑफरचा फायदा ग्राहकांना कसा घेता येईल यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये प्राईस वॉर सुरु आहे. तसेच प्रत्येक ग्राहकांना परवडेल असे रिचार्ज प्लॅन लाँच करण्यात आले आहेत. परंतु व्हीआय आणि जिओपैकी कोणता सर्वात स्वस्त वार्षिक प्लॅन ऑफर करतो? कोणाच्या प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता आणि अधिक इंटरनेट मिळते? जिओ आणि व्होडाफोनच्या कोणत्या प्लॅनमध्ये सर्वाधिक फायदे दिले जाणार आहेत, हे जाणून घेऊयात.
जिओचा ३५९९ रुपयांचा प्लॅन
मुकेश अंबानी यांनी जिओच्या ग्राहकांसाठी नवीन स्वस्त दरात प्लॅन लाँच केलेला आहे. त्यांच्या जिओच्या या प्लॅन खरेदी केल्यास तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. या प्लॅनची वैधता ३६५ दिवसांची असून यात तुम्हाला एकूण ९१२.५ जीबी डेटा मिळतो. तसेच दररोज 2.5 जीबी डेटा वापरता येणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये तुम्हाला जिओ सिनेमाचे सब्सक्रिप्शन मोफत मिळू शकते. दररोज १०० एसएमएस मोफत मिळतात. याशिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगही मोफत मिळते.
व्हीआयचा ३५९९ रुपयांचा प्लॅन
जिओप्रमाणेच व्हीआयदेखील तुम्हाला 3599 रुपयांचा वार्षिक प्लॅन ऑफर करतो. यामध्ये कंपनी अनेक फायदे देत आहे. ज्यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि अनलिमिटेड डेटा एका वर्षासाठी मोफत दिला जाणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला जिओपेक्षा कमी डेली डेटा लिमिट मिळत आहे. व्हीआय तुम्हाला दररोज 2 जीबी डेटा लिमिट ऑफर करते. या प्लॅनमध्ये तुम्हाला कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मचे फ्री सब्सक्रिप्शन मिळत नाही. तसेच या वार्षिक प्लॅनमध्ये तुम्हाला रोज १०० एसएमएस फ्री मिळतात.
व्हीआय ची दुसरी वार्षिक योजना
दुसरीकडे व्हीआयचा दुसरा वार्षिक प्लॅन पाहिला तर तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्म ॲमेझॉन प्राइमचे सब्सक्रिप्शन मिळते. पण या प्लॅनसाठी तुम्हाला तुमचं बजेट थोडं वाढवावं लागेल. व्हीआयचा हा प्लॅन तुम्हाला ३७९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तसेच या प्लॅनची वैधता ३६५ दिवसांची आहे. दररोज २ जीबी डेटा वापरता येईल. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १० एसएमएस फ्री मिळू शकतात.