JioPhone 5G मध्ये मिळणार स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, लॉन्चिंगआधी जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

जियोफोन 5जी (JioPhone 5G) पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. JioPhone त्याच्या किफायतशीर किमतीमुळे खूप चर्चेत आहे. यापूर्वी, कंपनीने जियोफोन नेक्स्ट (JioPhone Next) देखील सादर केला आहे, जो 4G सपोर्ट असलेला स्मार्टफोन आहे.

JioPhone 5G मध्ये मिळणार स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, लॉन्चिंगआधी जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Jiophone 5g
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 3:29 PM

मुंबई : जियोफोन 5जी (JioPhone 5G) पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. JioPhone त्याच्या किफायतशीर किमतीमुळे खूप चर्चेत आहे. यापूर्वी, कंपनीने जियोफोन नेक्स्ट (JioPhone Next) देखील सादर केला आहे, जो 4G सपोर्ट असलेला स्मार्टफोन आहे. नवीन रिपोर्ट्सनुसार, कंपनी एक नवीन स्मार्टफोन (New SmartPhone) तयार करत आहे, ज्यामध्ये 5G सपोर्ट फीचर्स उपलब्ध असतील. अँड्रॉइड सेंट्रलच्या रिपोर्टनुसार, JioPhone G मध्ये Qualcomm Snapdragon480 चिपसेट उपलब्ध असेल. या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. अँड्रॉइड सेंट्रलच्या अहवालानुसार, Jio Phone 5G मध्ये 6.5-इंचाची HD+ स्क्रीन मिळेल, जो एक IPS पॅनेल आहे. यात 20:9 आस्पेक्ट रेशो आहे. हा फोन Qualcomm च्या Snapdragon 480 चिपसेट सह येईल. यामध्ये यूजर्सना 4 जीबी रॅम मिळेल.

JioPhone 5G च्या संभाव्य कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, याच्या बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सलचा असेल, तर दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सलचा असेल, जो मॅक्रो सेन्सर आहे. तसेच, कंपनीने याच्या फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे, जो सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी उपयुक्त आहे. तथापि, कंपनीने अद्याप या फीचर्सची पुष्टी केलेली नाही.

JioPhone 5G मधील स्टोरेज स्पेस

JioPhone 5G च्या इतर संभाव्य स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 32 GB ऑनबोर्ड स्टोरेज उपलब्ध आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने यामधील स्टोरेज वाढवता येऊ शकते. कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 5G आणि 4G सपोर्ट देण्यात आला आहे.

JioPhone 5G ची संभाव्य किंमत

JioPhone 5G ची किंमत 9000 रुपये ते 12000 रुपयांच्या दरम्यान असू शकते. त्यात फायनान्सविषयक पर्यायांचाही समावेश असू शकतो. JioPhone Next मध्ये अशा प्रकारचा फायनान्स पर्याय देखील मिळाला होता.

कंपनीने गुगलसोबत मिळून गेल्या वर्षी Jio Phone Next तयार केला होता. हा एक परवडणारा 4G फोन आहे, जो टच स्क्रीन डिस्प्लेसह येतो. यात कॅमेऱ्यासह अनेक चांगले फायनान्स पर्याय देखील आहेत. कंपनीचा एक फीचर फोन देखील आहे, जो 4G कनेक्टिव्हिटी सह येतो. यात एक 4G डिव्हाइस आणि एक वर्षासाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेट डेटा उपलब्ध आहे.

इतर बातम्या

64MP कॅमेरा आणि आकर्षक फीचर्ससह Vivo T1 5G लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Budget 2022: संपूर्ण अर्थसंकल्प पाहायचाय? तुमच्या फोनवर डाऊनलोड करा Budget PDF डॉक्यूमेंट

OnePlus Nord 2T ची भारतातली किंमत लीक, एप्रिलमध्ये बाजारात, जाणून घ्या नव्या फोनची खासियत

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.