Jio ची धमाल, इतक्या स्वस्त फोनमध्ये WhatsApp चालवा

JioPhone | काही दिवसांपूर्वी ग्राहकांसाठी जिओने एक खास फोन आणला आहे. या स्वस्त 4जी फोनची विक्री आज 8 नोव्हेंबरपासून सुरु झाली आहे. या अगदी किफायतशीर मोबाईलची सध्या बाजारात चर्चा आहे. कारण हा मोबाईल अगदी अविश्वसनीय किंमतीत मिळत आहे. या फोनमध्ये व्हॉट्सअपमध्ये सुद्धा चालविता येणार आहे.

Jio ची धमाल, इतक्या स्वस्त फोनमध्ये WhatsApp चालवा
Follow us
| Updated on: Nov 08, 2023 | 5:54 PM

नवी दिल्ली | 8 नोव्हेंबर 2023 : Reliance Jio ने काही दिवसांपूर्वी अत्यंत किफायतशीर किंमतीत JioPhone Prima 4G लाँच केला होता. आज 8 नोव्हेंबर रोजी या स्वस्त फोनची विक्री सुरु झाली आहे. तुमचे बजेट तीन हजार रुपयांपेक्षा पण कमी असले तरी तुम्हाला हा फोन मिळू शकतो. हा स्वस्तातील फोन तुमच्या पसंतीला उतरु शकतो. हा 4जी फोन आहे. या फोनमध्ये WhatsApp आणि Facebook सारखी ॲप पण सहज चालवू शकता. JioPhone Prima 4G हा फोन तुम्ही स्वस्तात खरेदी कराल. तर तुम्हाला या फोनमध्ये इतर पण फीचर्स मिळतील. काय आहेत हे फीचर..

JioPhone Prima 4G फीचर्स

  • जिओच्या या किफायतशीर JioPhone Prima 4G मोबाईलमध्ये 320×240 पिक्सल रिझॉल्यूशनची टीएफटी स्क्रीन देण्यात आली आहे. 3 हजारांपेक्षा कमी किंमतीच्या या 4जी फोनमध्ये 1800 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
  • या फोनमध्ये 23 भाषा आहेत. तुम्ही आवडीची भाषा निवडून हा फोन चालवू शकता. या फोनमध्ये 0.3 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. कमी बजेटमध्ये हा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.
  • स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी जिओफोन प्राईमा 4जीमध्ये ARM कोर्टेक्स ए53 प्रोसेसर देण्यात आला आहे. इतकेच नाही तर मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने या फोनमध्ये 128 जीबीपर्यंत स्टोअरेज वाढवता येते.
  • कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ व्हर्जनला 5.3 सपोर्ट आहे. यासोबतच वायर्ड मायक्रोफोन कनेक्ट करण्यासाठी 3.5 मिलीमीटर हेडफोन जॅक आणि एफएम रेडिओसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.
  • जिओफोन प्राईमामध्ये एफएम रेडिओ देण्यात आला आहे. ग्राहकांना या फोनमध्ये त्यांची आवडती चॅनेल्स सुद्धा बघता येईल. या फोनमध्ये जिओटीव्ही, जिओसिनेमा, जिओसिनेमा, जिओसावन आणि जिओन्यूज सारखे अ‍ॅप्स पण देण्यात आले आहे. हा एक प्रीमियम डिझाईन असलेला फिचर फोन आहे. या फोनमध्ये युट्यूब पण चालेल.

JioPhone Prima 4G ची किंमत काय

हे सुद्धा वाचा

या फोनची किंमत ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. हा किफायतशीर फोन अवघ्या 2 हजार 599 रुपयांना मिळेल. हा फोन ग्राहकांना Reliance Digital आणि JioMart च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. हा फोन इतर ई-कॉमर्स संकेतस्थळावर Amazon वर पण मिळेल.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.