कावासाकीची नवीन बाईक लाँच, किंमत तब्बल…
मुंबई : कावासाकीने अँडव्हेंचर बाईक ‘Kawasaki Versys 1000’ भारतात लाँच केली. 10.69 लाख रुपये या बाईकची एक्स शोरुम किंमत आहे. नवीन कावासाकी Kawasaki Versys 1000 ला EICMA 2018 ने भारतात लाँच केले आहे. नवीन बाईक पर्ल फ्लॅट स्टारडस्ट व्हाईट आणि मेटेलिक फ्लॅट स्पार्क ब्लॅक अशा दोन रंगात उपलब्ध आहे. या बाईकमध्ये 1043 cc, इन-लाइन, 4-सिलिंडर […]
मुंबई : कावासाकीने अँडव्हेंचर बाईक ‘Kawasaki Versys 1000’ भारतात लाँच केली. 10.69 लाख रुपये या बाईकची एक्स शोरुम किंमत आहे. नवीन कावासाकी Kawasaki Versys 1000 ला EICMA 2018 ने भारतात लाँच केले आहे. नवीन बाईक पर्ल फ्लॅट स्टारडस्ट व्हाईट आणि मेटेलिक फ्लॅट स्पार्क ब्लॅक अशा दोन रंगात उपलब्ध आहे.
या बाईकमध्ये 1043 cc, इन-लाइन, 4-सिलिंडर इंजिन दिले आहे. ही बाईक 120hp पॉवर आणि 102Nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये काही कॉस्मेटिक बदल केले आहेत. नवीन बाईकचा फ्रंट लूक पहिल्यापेक्षा शार्प आहे. यामध्ये एलईडी हेडलाईट, अॅडजस्टेबल विंडस्क्रीन आणि एलसीडी सेमी-डिजिटल मीटर दिला आहे.
नवीन कावासाकी वर्सेस 1000 मध्ये कावासाकी ट्रॅक्शन कंट्रोल (KTRC), क्रूज कंट्रोल, कावासाकी कॉर्निंग मॅनेजमेंट फंक्शन (KCMF) आणि कावासाकी इंटेलिजेंट एबीएससारखे सेफ्टी फीचर्स आहेत. बाईकमध्ये दोन पॉवर मोड दिले आहेत. बाईकचे फ्रंट आणि रिअर सस्पेंशनही अपडेट केले आहेत. तसेच बाईकची दोन्ही व्हील 17 इंच आहेत. बाईकच्या सीटची उंची 790mm आहेत. यामध्ये 21 लीटरचा फ्लूएल टँक दिला आहे.
कावासाकीच्या नवीन अँडव्हेंचर बाईकची बुकिंग सुरु आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरुन ही बाईक बूक केली जाऊ शकते. बाईकची डिलिव्हरी मार्चच्या सुरुवातीला होऊ शकते. मार्केटमध्ये सुरुवातीला या नवीन बाईकची टक्कर Ducati Multistrada 950 बाईक सोबत होणार असल्याचे बोललं जात आहे.