Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

iPhone च्या लक्षात ठेवा या 3 सेटिंग, चोरटा स्वतःहून परत करेल स्मार्टफोन

iPhone | गर्दीत फोन चोरी होण्याचे प्रमाण कमी नाही. पण शोधणे आजही सोपे नाही. कारण चोरटे सिम कार्ड फेकून देतात. आता इतर तंत्रज्ञाना आधारे मोबाईल शोधता येतो. पण त्याला वेळ लागतो. iphone मध्ये या 3 सेटिंग केल्या तर स्मार्टफोन चोरीला गेला तरी चोरटा स्वतःचे डोकं झोडून घेईल. कारण त्याचा डाव त्याच्यावरच उलटेल.

iPhone च्या लक्षात ठेवा या 3 सेटिंग, चोरटा स्वतःहून परत करेल स्मार्टफोन
Follow us
| Updated on: Nov 02, 2023 | 3:39 PM

नवी दिल्ली | 2 नोव्हेंबर 2023 : गर्दीत, प्रवासादरम्यान सतर्क नाही राहिल तर मोबाईल हमखास चोरीला जाण्याचे प्रमाण अधिक आहे. देशात दररोज कित्येक लोकांचे फोन चोरीला जातात. सायबर पोलिसांकडे तक्रार केली तरी फार कमी लोकांचे मोबाईल परत मिळतात. स्मार्टफोन चोरीनंतर चोरटे त्यातील सिम कार्ड फेकून देतात. तर काही चोरटे लॅपटॉपच्या मदतीने मोबाईल रिसेट करतात. आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे मोबाईलचे नवीन लोकेशन कळते. पण त्याला मर्यादा आहेत. सगळेच चोरलेले मोबाईल परत मिळत नाही. महागड्या आयफोनवर चोरट्यांची जास्त नजर असते. iphone मध्ये या 3 सेटिंग केल्या तर स्मार्टफोन चोरीला गेला तरी चोरट्याच्या डोक्याला ताप होतो. कोणत्या आहेत या सेटिंग्ज?

  1. सर्वात अगोदर Find My मध्ये जा. Find my iPhone हा पर्याय निवडा. त्यानंतर Send Last Location हे इनेबल करा. त्यामुळे फोन जेव्हा पण Switch Off होईल. त्यातील Find My लास्ट लोकेशन आपोआप शेअर होईल. तर हा मोबाईल जेव्हा पण स्विच ऑन होईल, तेव्हा पण त्याचे लोकेशन शेअर होईल.
  2. त्यासाठी तुम्हाला FaceID आणि Passcode मध्ये जावे लागेल. त्याठिकाणी Control मध्ये जाऊन Accessories डिसेबल करा. त्यामुळे तुमचा आयफोन कधीही फ्लाईट मोडवर टाकता येणार नाही. PC मध्ये वायरने जोडणी करुन तुमचा स्मार्टफोन रिसेट पण करता येणार नाही.
  3. युझर्सने Settings वर जाऊन Screen Time निवडायचा आहे. यामध्ये Content & Privacy Restriction वर टॅप करा. त्यानंतर जे पेज उघडेल त्यावर इनेबल करा. खालील बाजूस स्क्रोल करुन Passcode & Account change वर जा आणि Dont Allow असे करा.
  4. आता मागे फिरा, बॅक करुन Screen Time वर पासवर्ड सेट करा. यामुळे चोराला तुमचा पासवर्ड माहिती जरी झाला. तरी त्याला एपलचा आयडी रिमूव्ह अथवा चेंज करता येणार नाही. युझर्सला e-Sim च्या वापराचा सल्ला देण्यात येतो. त्यामुळे चोरटा हे सिम काढू शकणार नाही.
  5. हे सुद्धा वाचा

नवीन फीचर पण कामाचे

कॉन्टक्ट की व्हेरीफीकेशन या फीचरचा नुकताच एपलने आयफोनमध्ये समावेश केला आहे. कंपनीचे हे नवीन सिक्युरिटी फीचर आहे. iMessage आणि iCloud माध्यमातून त्याचा वापर होतो. iMessage ला कोणत्याही हल्ल्या पासून वाचविता येऊ शकेल. हे फीचर ऑन ठेवताच कोणत्याही अनोळखी iMessage अकाऊंटशी जोडले गेल्यास ऑटोमेटिक अलर्ट मिळतो.

जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?.
सप्तश्रृंगी गडावर भविकांची अलोट गर्दी, एकमेकांना ढकलाढकली; घडलं काय?
सप्तश्रृंगी गडावर भविकांची अलोट गर्दी, एकमेकांना ढकलाढकली; घडलं काय?.
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही...
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही....
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ.
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली.
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर.
'मुंडे खोटारडा माणूस, दर दिवशी नवीन बायका..' करूणा शर्मांचा गौप्यस्फोट
'मुंडे खोटारडा माणूस, दर दिवशी नवीन बायका..' करूणा शर्मांचा गौप्यस्फोट.
मोस्ट वॉन्टेड तहव्वूर राणाला अखेर भारतात आणलं
मोस्ट वॉन्टेड तहव्वूर राणाला अखेर भारतात आणलं.
ही सवय खूप घाण, औरंगजेबासोबत मुंडेंची तुलना? करूणा शर्मांचा गंभीर आरोप
ही सवय खूप घाण, औरंगजेबासोबत मुंडेंची तुलना? करूणा शर्मांचा गंभीर आरोप.
एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार कधी? गुणरत्न सदावर्तेंची मोठी माहिती
एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार कधी? गुणरत्न सदावर्तेंची मोठी माहिती.