Airtel च्या या प्लॅन्समध्ये मिळतो अनलिमिटेड 5G डेटा आणि बरंच काही
Airtel 5G Plans : जर तुम्ही देखील एअरटेल वापरकर्ते असाल, तर तुमच्या फायद्याचे काही प्लॅन्स जाणून घ्या.
नवी दिल्ली : एअरटेल (Airtel) या टेलिकॉम कंपनीकडे आपल्या प्रीपेड युजर्ससाठी अनेक उत्तम योजना आहेत. जर तुम्ही देखील Airtel चे युजर (user) असाल आणि डेटा व कॉलिंग (data and calling) व्यतिरिक्त तुम्हाला Disney Plus Hotstar चा लाभ देखील मोफत मिळेल, असा प्लॅन शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. जरूर वाचा.
Airtel 399 Plan Details
या प्लॅनमध्ये 2.5 GB डेटासह अमर्यादित मोफत कॉलिंग आणि 100 SMS दररोज मिळतात. इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, 399 रुपयांच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांची व्हॅलिडिटी आणि 3 महिन्यांसाठी Disney Plus Hotstar मोबाइलवर मोफत प्रवेश मिळतो. डिस्ने प्लस हॉटस्टार व्यतिरिक्त, ही योजना अपोलो 24/7 सर्कल मेंबरशिपचा लाभ देखील देते.
Airtel 499 Plan Details
499 रुपयांच्या या प्लॅनमध्येही तुम्हाला 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. तसेच या प्लॅनमध्ये दररोज 3 GB हाय स्पीड डेटा, तसेच कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉलिंग सुविधा आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. या प्लॅनसह, तुम्हाला 3 महिन्यांच्या वैधतेसह Disney Plus Hotstar चा लाभ मिळेल.
Airtel Rs 839 Plan Details
जर तुम्हाला 28 दिवसांपेक्षा जास्त काळ म्हणजेच कमीत कमी 84 दिवसांची स्पीड डेटा मिळेल. दररोज डेटा, कोणत्याही मोफत लोकल आणि एसटीडी कॉलिंगचा लाभ नेटवर्कवर दिला जात आहे. या एअरटेल प्लॅनसह, तुम्हाला 3 महिन्यांसाठी Disney Plus Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाईल.
येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की 239 रुपयांच्या वरच्या सर्व एअरटेल प्लॅनसह, कंपनी अमर्यादित 5G डेटा ऑफर करत आहे. याशिवाय, कंपनीकडे एक दीर्घ व्हॅलिडिटी योजना देखील आहे जी 365 दिवसांची व्हॅलिडिटी वैधता देते आणि या प्लॅनची किंमत 3359 रुपये आहे.