या कंपनीचा धमाका, अवघ्या 87 रुपयांमध्ये मिळवा अनलिमिटेड कॉलिंग आणि….
एअरटेलचा 155 रुपयांचा प्लॅन किंवा बीएसएनएलचा 87 रुपयांचा प्लॅन, दोन्ही कंपन्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला कोणते फायदे मिळतात ते जाणून घ्या.
नवी दिल्ली : युजर्स अथवा वापरकर्त्यांच्या (for users) सोयीसाठी अनेक टेलिकॉम कंपन्या (telecom companies) त्यांच्या प्लॅनमध्ये बदल करत असतात. जर तुम्ही महागड्या रिचार्ज प्लॅनमुळे हैराण असाल आणि कमी किमतीत अधिक फायदे असलेला प्लॅन (cheaper plan) मिळवू इच्छित असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. एअरटेलच्या रु. 155 प्लॅनच्या तुलनेत तुम्हाला बीएसएनएलकडून रु.87 च्या प्लॅनमध्ये तुम्हाला अधिक फायदा मिळेल. 87 रुपयांचा प्लॅन युजर्ससाठी चांगला पर्याय आहे. हे डेटा आणि अनलिमेटेड (अमर्यादित) व्हॅलिडिटीसह येते आणि त्यामध्ये जास्त पैसेही खर्च होत नाहीत. येथे आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या 87 रुपयांच्या आणि 97 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला कोणते फायदे मिळतात ते सांगणार आहोत. याशिवाय एअरटेलच्या 155 रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला कोणते फायदे मिळतात तेही जाणून घेऊया.
BSNL 87 रीचार्ज प्लॅन
बीएसएनएलचा 87 रुपयांचा रिचार्ज प्लॅन 14 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. यामध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि गेमिंगचा फायदा तर मिळतोच त्ययासह रोजचा 1GB डेटाही मिळतो. मात्र या प्लॅनमध्ये तुम्हाला मोफत एसएमएस मिळत नाहीत. या प्लानमध्ये यूजर्सना 14GB डेटा मिळेल.
BSNL 97 रीचार्ज प्लॅन
जर यूजर्सना जास्त डेटा वापरायचा असेल तर ते 97 रुपयांचा प्लॅन देखील घेऊ शकतात. मात्र हे लक्षात घ्या की या प्लॅनमध्येही यूजर्सना एसएमएसचा फायदा मिळत नाही. हा प्लॅन 15 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. आणि त्यामध्ये दररोज 2GB डेटा ऑफर करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये यूजरला 30GB डेटाचा फायदा मिळतो.
Airtel 155 रीचार्ज प्लॅन
Airtel ने आधीच त्यांच्या वापरकर्त्यांसाठी अथवा युजर्ससाठी एंट्री-लेव्हल प्लॅनची किंमत 155 रुपयांपर्यंत वाढवली आहे. एअरटेलच्या 155 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड (अमर्यादित) लोकल, एसटीडी आणि रोमिंग मिनिटांचा लाभ मिळतो. तसेच यामध्ये 24 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 1GB डेटा आणि 300 SMS उपलब्ध आहेत. याशिवाय युजर्सना विंक म्युझिक आणि फ्री हेलोट्यून्स यांसारखे इतर फायदे देखील मिळतात.