Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

I’m not a robot का लिहीलं जातं ? फक्त माणूसच कॅप्चा सॉल्व्ह करू शकतो का ?

CAPTCHA : अनेक साईट्स ओपन करताना I'm not a robot असे लिहीलेले असते व ते आधी सॉल्व्ह करूनच पुढे जाता येते. हे नेमके का होते, हे जाणून घेऊया.

I’m not a robot का लिहीलं जातं ?  फक्त माणूसच कॅप्चा सॉल्व्ह करू शकतो का ?
Image Credit source: file photo
Follow us
| Updated on: Apr 03, 2023 | 7:40 AM

नवी दिल्ली : आजकाल आपण लॅपटॉप किंवा मोबाईलवरून बरीच खरेदी किंवा ट्रॅन्झॅक्शन्स करत असतो. ऑनलाइन काही खरेदी करायचे (online shopping) असेल किंवा फॉर्म भरायचा असेल तर त्या साईटवर पोहोचण्यापूर्वी I am Not Robot (मी रोबोट नाही) असं लिहीलेला कॅप्चा (captcha) कधी ना कधी तुमच्या समोर आलाच असेल. जोपर्यंत तुम्ही कॅप्चामधील I am Not Robot या बॉक्सवर क्लिक करत नाही, तोपर्यंत तुम्हाला तुमचं काम पुढे करता येत नाही. अशा परिस्थितीत, कोणतंही काम करण्यासाठी किंवा त्या साईटवर (site) पुढे जाण्यासाठी कॅप्चा भरणे ही एक आवश्यक पायरी बनते.

पण फॉर्म किंवा शॉपिंग वगैरे करताना हा CAPTCHA (कॅप्चा) का भरावा लागतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? किंवा आपण ते भरल्याशिवाय पुढे का जाऊ शकत नाही हे तुम्हाला माहीत आहे का ?

हा कॅप्चा म्हणजे काय आणि बहुतेक प्लॅटफॉर्म त्यावर का अवलंबून आहेत हे जाणून घेऊया.

CAPTCHA म्हणजे कम्प्लीटली ऑटोमेटेड पब्लिक ट्यूरिंग टेस्ट टू टेल कॉम्प्युटर्स अँड ह्यूमन अपार्ट (Completely Automated Public Turing test to tell Computers and Humans Apart) होय. जर आपण त्याच्या कामाबद्दल बोललो, त्याचे कार्य काय आहे ते समजून घेऊया. हा कॅप्चा असे एक चॅलेंज तयार करते, जो एखादा मनुष्यचं सोडवू शकतो, रोबोट नव्हे. यामध्ये इमेजवर काही अक्षरे लिहीलेली असतात, ती ओळखून टाईप करून सबमिटवर क्लिक करावे लागते. याशिवाय अनेक वेळा काही फोटोही सिलेक्ट करावे लागतात.

कॅप्चा का असतो महत्वाचा ?

अनेकदा, कोणताही फॉर्म भरतातना किंवा काही शॉपिंग करताना आपण घाईत असतो, अशा वेळी ही कॅप्चाची स्टेप समोर आल्यानंतर आपल्याला ते अतिशय निरुपयोगी वाटते व त्यामध्ये वेळ का वाया घालवायचा असा प्रश्नही आपल्याला पडतो. पण कोणत्याही फायननल स्टेपवर पोहोचण्यापूर्वी कॅप्चा हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. हे कंपनीने तयार केले आहे जेणेकरून त्यातील कोणतेही बॉट्स आपोआप फॉर्म भरणे, खाती (अकाऊंट) तयार करणे, स्पॅम कमेंट सबमिट करणे, थांबवू शकते. यासह, बॉट्स आपोआप कोणत्याही साइटवर कोणतीही ॲक्टिव्हिटी करू शकत नाहीत.

बॉट्स हे कॅप्चापेक्षा असतात वेगवान

आजच्या डिजिटल युगात, तंत्रज्ञान इतके उच्च झाले आहे की अनेक बॉट्स कॅप्चाला बायपास करण्यास सक्षम आहेत. पण बहुतांशी कॅप्चा स्वयंचलित अथवा ऑटोमॅटिक हल्ले रोखण्यात यशस्वी होतो. जे लोक पाहू किंवा ऐकू शकत नाहीत त्यांच्यासाठी कधीकधी कॅप्चा हे एक मोठे आव्हान बनते. अशा स्थितीत जोपर्यंत ते (कॅप्चा) भरत नाहीत, तोपर्यंत त्यांचे कामही पूर्ण होत नाही. या समस्येच्या पार्श्वभूमीवर, कॅप्चा प्रोव्हायडर्स हे यावर देखील काम करत आहेत जेणेकरून युजर्सना यामुळे कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू नये.

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी.
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा.
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत.
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्.
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका.
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या..
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती.
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?.