खिशाला बसणार चाट की होणार भार हलका ? आजपासून ही गॅजेट्स होणार स्वस्त, तर ही होणार महाग !
आज 1 एप्रिलपासून अनेक गोष्टींच्या किंमती वाढणार असून काही गोष्टी स्वस्तही होणार आहेत. कोणती ग२जेट्स व इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्स होतील महाग, कशाचे भाव होणार कमी हे जाणून घेण्यासाठी वाचा.
नवी दिल्ली : आज म्हणजेच 1 एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. मात्र नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच सर्वसामान्य लोकांसाठी अनेक गोष्टी महाग (expensive) झाल्या आहेत, मात्र असे असले तरी चिंतेचे फारसे कारण नाही. कारण दुसरीकडे काही वस्तू स्वस्तही (cheaper price) झाल्या आहेत. उत्पादने स्वस्त आणि महाग झाल्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशाला बसतो. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की 1 एप्रिलपासून कोणते गॅजेट्स (gadgets) आणि इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट (electronic products) खरेदी करण्यासाठी स्वस्त आणि महाग होतील. थोडक्यात आपल्या खिशाला चाट बसणार आहे का खिशावरील भार थोडा हलका होणार आहे, ते आपण जाणून घेऊया.
आधी काय स्वस्त होणार ते पाहूया.
टीव्ही पॅनेलचे पार्ट्स
आजपासून, टीव्ही पॅनेलच्या खुल्या विक्री भागांवरील कस्टम ड्युटी 2.5 टक्क्यांनी कमी करण्यात आली आह. टीव्हीच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे, हे यामागचे कारण असल्याचे समजते.
मोबाईल फोनशी संदर्भात या गोष्टीही होतील स्वस्त
मोबाईल फोनची निर्मिती करण्यासाठी वापरल्या जाणार्या काही वस्तूंवरील कस्टम ड्युटी देखील कमी करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत त्यात कॅमेरा लेन्सचा समावेश आहे. केवळ फोनची लेन्सच नाही तर प्रोफेशनल फोटोग्राफीसाठी स्मार्टफोन, डीएसएलआर कॅमेरा आणि लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या लोकांनाही आजपासून फायदा होणार आहे, कारण आजपासून ही तीनही उत्पादने स्वस्त झाली आहेत.
लिथियम इऑन बॅटरी
स्मार्टफोन आणि इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणार्या लिथियम-इऑन सेलच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणार्या मशिनरीवरील कस्टम ड्युटीमध्येही सरकारने सूट दिली आहे. त्यामुळे हे उत्पादनही आजपासून स्वस्त होणार असल्याचे समजते.
अद्याप दर कपातीची घोषणा केलेली नाही
आत्तापर्यंत कोणत्याही कन्झ्युमर (ग्राहक) इलेक्ट्रॉनिक किंवा स्मार्टफोन ब्रँडने आपल्या उत्पादनांच्या किंमती कमी करण्यासंबंधी कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे या उपकरणांच्या किमती कमी झाल्या तर किती कमी होतील हे पाहण्यासारखे ठरेल.
ही इलेक्ट्रॉनिक उपकरणे होतील महाग
आपल्या घरातील स्वयंपाकघरात वापरण्यात येणारी चिमणी खरेदी करणे आजपासून तुम्हाला महाग पडू शकते. 2023 च्या सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पादरम्यान चिमणीवरील कस्टम ड्युटी 7.5 टक्क्यांवरून 15 टक्के करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती.