Vedanta-Foxconn | लॅपटॉप मिळणार 60 टक्के कमी किमतीत..कसं ते पाहा..
Vedanta-Foxconn | देशातील लॅपटॉप अत्यंत स्वस्त दराने मिळणार आहेत. लॅपटॉप तब्बल 60 टक्के कमी किंमतींनी मिळणार आहे. पण ही जादूची कांडी फिरणार कशी ते पाहुयात..
Vedanta-Foxconn | देशात लॅपटॉप (Laptop) अत्यंत स्वस्त (Cheaper Price) मिळणार आहे. लॅपटॉपमधील चिप (Chip) मिळण्याची अडचण आता लवकरच दूर होणार आहे. त्यामुळे लॅपटॉपच्या किंमती भूतो न भविष्यती इतक्या कमी होणार आहे. लॅपटॉपच्या किंमती 60 टक्क्यांनी कमी होतील. त्यामुळे ग्राहकांची चांदी होणरा आहे.
चिप नसल्याने किंमती गगनाला
चिपच्या तुटवड्यामुळे भारतात तयार होणाऱ्या लॅपटॉपच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. लॅपटॉपसाठी ग्राहकांना 60,000 ते 1 लाख रुपये मोजावे लागत आहेत.
महाग तरी मागणी जास्त
लॅपटॉप महाग असला तरी त्याची गरज वाढली आहे. त्यामुळे महाग असला तरी लॅपटॉपची मागणी घटली नाही.
गुजरातमध्ये सेमीकंडक्टरचे उत्पादन
वेदांता ग्रुपने सेमीकंडक्टर उत्पादनात पाऊल ठेवले आहे. वेदांता-फॉक्सकॉन गुजरातमध्ये देशातील पहिला सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प लवकरच उभारणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्यात येणार होता.
1.54 लाख कोटींचा खर्च
देशातील या पहिल्या सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी 1.54 लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. गुजरात राज्यात यामुळे 1 लाख जणांना रोजगार मिळणार आहे.
इतकी होईल किंमत कमी
या प्रकल्पामुळे 1 लाखांचा लॅपटॉप आता 40,000 हजार रुपयांना मिळणार आहे. लवकरच लॅपटॉप सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील.
मक्तेदारी मोडीत
तैवान आणि कोरियाची सेमीकंडक्टर निर्मितीत मक्तेदारी आहे. इतर ही काही देशात सेमीकंडक्टर तयार होते. भारत या देशांवर अवलंबून होता. आता देशातच सेमीकंडक्टरची निर्मिती होत आहे.
38 टक्के हिस्सेदारी
वेदांता आणि फॉक्सकॉन यांच्या संयुक्त उपक्रमातून हा प्रकल्प उभारत आहे. या प्रकल्पात फॉक्सकॉनची 38 टक्के भागीदारी असेल.
दोन वर्षांची प्रतिक्षा
हा प्रकल्प सुरु होऊन सेमीकंडक्टर निर्मितीला आणखी दोन वर्षे लागणार आहेत. कंपनीला या प्रकल्पातून 3.5 दशलक्ष डॉलरच्या उलाढालीची अपेक्षा आहे.
तर चीनला फटका
इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या आयातीवर भारताने वर्ष 2020 मध्ये 15 दशलक्ष डॉलर खर्च केले आहे. यातील 37% आयात एकट्या चीनमधून करण्यात आली आहे. जर ही आयात बंद झाली तर देशाच्या सकल उत्पादनात 8 दशलक्ष डॉलरचा थेट फायदा होईल.