Xiaomi 14 सर्वात पॉवरफूल स्मार्टफोन लॉंच होणार, याच्यापुढे DSLR देखील फेल
कॅमेरा फोनची आवड असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. आजकाल मोबाईल फोन बोलण्यापेक्षा कॅमेऱ्याने फोटो काढण्यासाठी सर्वाधिक वापरला जात आहे. प्रत्येकजण उत्कृष्ट सेल्फीसाठी चांगला कॅमेरा असलेल्या मोबाईलची निवड करीत असतात.
मुंबई | 19 फेब्रुवारी 2024 : शाओमी कंपनीने भारतात आपला लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi 14 च्या लॉंच डेटची घोषणा केली आहे. हा फोन Leica पॉवर्ड कॅमेरा सेटअप सोबत बाजारात येत्या 7 मार्च रोजी उतरविला जाणार आहे. चीनची कंपनी असलेल्या शाओमी भारतात लॉंच होणारा हा दुसरा Leica ब्रॅंडेड कॅमेरा असलेला हा फोन आहे. या फोन चीनमध्ये गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात लॉंच केले होते. आता हा फोन जागतिक बाजारपेटेसाठी उपलब्ध होणार आहे.
Xiaomi 14 हा चीनमध्ये लॉंच होणाऱ्या निवडक स्मार्टफोन पैकी एक आहे ज्यात Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर आहे. शाओमी कंपनी भारतात देखील हेच मॉडेल लॉंच करू शकते. शाओमीद्वारा यावर्षी आणल्या जाणाऱ्या सर्वात कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप फोनपैकी हा एक फोन म्हटला जात आहे.या स्मार्टफोनचा हॅंडसेटला 6.36 इंच 120 हर्ट्झ डिस्प्लेचा स्क्रीन दिला आहे. ही स्क्रीन फुल एचडी + रिझॉल्युशनची आहे आणि ही ,स्क्रीन 300 निट्सच्या पिक ब्राईटनेसची आहे.
शाओमी 14 मध्ये 50 MP ट्रीपल रिअर कॅमेरा
शाओमी 14 ची खासियत म्हणजे याचा कॅमेरा आहे. कारण याची कॅमेरा सिस्टीम एकदम खास आहे. या फोनमध्ये 50 मेगा पिक्ससचा ट्रीपल कॅमेरा सेटअप दिला आहे. त्यात एक वाइड – अॅंगल आणि एक अल्ट्रा वाईड अॅंगल लेन्सचा समावेश आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी सेंसर आहे. अॅंड्रॉईड ओपन सोर्स प्रोजेक्ट ( AOSP ) बेस्ड HyperOS सह लॉंच होणारा हा कंपनीचा पहिला फोन आहे. या शिवाय Xiaomi 14 मध्ये पाणी आणि धुळीचा प्रादुर्भाव होणार नाही. त्यासाठी त्याला IP68 रेटींग मिळाली आहे. मेटल ग्लॅस सॅंडविच डीझाईन, डेटा ट्रान्सफरसाठी USB 3.2 पोर्ट आणि लेटेस्ट वायरलेस स्टॅंडर्डसाठी वाय-फाय 7 आणि ब्ल्यु टुथ 5.4 सारखे फिचर्स आहेत.
या फोन मिळणार टक्कर
या फोनला MWC 2024 मध्ये लॉंच केले जाऊ शकते. Xiaomi 13 Pro ला 74,999 रुपयांत बाजारात उतरविण्यात आले होते. त्यामुळे या नव्या Xiaomi 14 ची किंमतीही याच आसपास असेल असे म्हटले जात आहे. हा फोन महाग असला तरी कॅमेरा चांगला असल्याने सेल्फीच्या चाहत्यांसाठी तसेच फोटोग्राफी करण्याची आवड असलेल्यासाठी उत्तम ठरु शकतो. बाजारातील आधीच असलेल्या iQOO 12, One Plus 12, आणि Snapdragon 8 Gen 3 पॉवर्ड इतर एड्रॉईड स्मार्टफोनला तो टक्कर देणार असल्याचे म्हटले जात आहे.