देशी कंपनीने लाँच केला 5000mAh बॅटरीवाला भन्नाट स्मार्टफोन, किंमत खूपच कमी
भारतामध्ये एका देशी मोबाईल कंपनीने एक स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन लाँच केलेला आहे. हा फोन साध्या फोनकडून स्मार्टफोनकडे वळणाऱ्या लोकांसाठी चांगला बजेट फोन आहे. 5,000mAh ची दमदार बॅटरी आणि इतर सुविधा यात आहेत.

देशी ब्रँड Lava ने आणखी एक स्वस्तातला बजेट फोन लाँच केला आहे. या लावा कंपनीच्या फोनची किंमत अतिशय कमी आहे. या स्मार्टफोनची बॅटरी क्षमता 5,000mAh इतकी मोठी आहे, या फोनचे फिचर्स चांगले आहेत. चीनी कंपन्यांना टक्कर देणारा हा देशी फोन एकाच स्टोरेड व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या आधी देखील लाव्हा कंपनीने अनेक स्वस्त 5G फोन लाँच केले आहेत. या फोनची खास वैशिष्ट्ये म्हणजे हा फोन साध्या फोनवरुन स्मार्टफोनकडे वळणाऱ्यासाठी उपयुक्त आहेत.
फोनची किंमत काय ?
Lava Yuva Smart फोन कंपनीने 3GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये नवा स्वस्तातला स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत अवघी सहा हजार रुपये आहे. या फोनला पाठमागची बाजू ग्लॉसी फिनिश दिलेली आहे.या फोनला तीन पर्यायी रंगामध्ये लाँच केले आहे. यात ग्लॉसी ब्ल्यू, ग्लॉसी व्हाईट आणि ग्लॉसी लेव्हेंडर अशा तीन रंगातील मॉडेल्स बाजारात आली आहेत.
Lava Yuva Smart चे फिचर्स कसे आहेत?
या लाव्हा कंपनीच्या फोनची स्क्रीन 6.75 इंचाची आहे. वॉटरड्ऱॉप नॉच डिझाईनच्या या फोनचा डिस्प्लेत HD+ रिझॉल्यूशचा सपोर्ट दिलेला आहे. या फोनचा डिस्प्ले 60Hz स्टॅंडर्ड रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.




लाव्हाच्या या फोनमध्ये Unisoc 9863A प्रोसेसर दिलेला आहे. या फोनमध्ये 3GB रॅम दिलेला आहे. या रॅमला व्हर्च्युअली 3GB पर्यंत वाढविता येऊ शकते. या फोनला 64GB इंटर्नल स्टोरेज दिलेला असून मायक्रो एसडी कार्डद्वारे त्याला 512GB पर्यंत एक्सपांड करता येते.
या स्मार्ट फोन Android 14 Go ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. या फोनमध्ये साईड माऊंटेड फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. या शिवाय यात सिक्युरिटीसाठी एक फेस अनलॉक देखील दिलेला आहे.
लाव्हाचा स्वस्त आणि मस्त फोन 5,000mAh च्या दमदार बॅटरीचा असून याच्या सोबत 10W चा USB Type C फास्ट चार्जिंग फिचर आहे.
Lava Yuva Smart फोनच्या पाठचा कॅमेरा AI ड्युअल कॅमरा सेटअप दिलेला आहे.या स्मार्ट फोनमध्ये 13MP चा मुख्य कॅमेरा आणि एक सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हीडियो कॉलिंगसाठी लाव्हाच्या या स्मार्टफोनमध्ये 5MPचा सेल्फी कॅमरा देण्यात आला आहे.