बाळाचा पिता कोण ? मुलाचं नाव ठेवण्यासाठी त्याने घेतली ChatGPTची मदत अन् भडकली ना बायको….

ChatGPT : जेव्हापासून चॅटजीपीटी आलं आहे, तेव्हापासून जगभरात खळबळ माजली आहे. पण त्यामुळे एखाद्या पती-पत्नीमध्ये भांडण होऊ शकते, याचा कोणी विचार केला आहे का ?

बाळाचा पिता कोण ? मुलाचं नाव ठेवण्यासाठी त्याने घेतली ChatGPTची मदत अन् भडकली ना बायको....
Follow us
| Updated on: Apr 12, 2023 | 2:07 PM

बीजिंग : सध्याचे युग हे आर्टिफिशयल इंटेलिजन्सचे अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचे (AI)आहे. पण ChatGPT आल्यानंतर जगात खळबळ माजली आहे. प्रत्येकजण त्यांच्या प्रश्नांची उत्तरे ChatGPT ला विचारत आहेत. लोक लहान-लहान गोष्टींची उत्तरं जाणून घेण्यासाठी त्याचा वापर करत आहेत. पण याच चॅटजीपीटीमुळे घरात कलह निर्माण होईल, असे कुणालाही वाटले नसेल. अशीच एक घटना हाँगकाँगमधून (Hong Kong) समोर आली आहे. जिथे एका पतीने आपल्या न जन्मलेल्या मुलाचे नाव ठेवण्यासाठी AI ची मदत घेतली. पण असे करणे त्याला महागात पडले आणि त्याची पत्नी भयानक चिडली.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, एका जोडप्याला लवकरच बाळ होणार आहे. त्यासाठी पत्नीने आपल्या पतीला त्यांच्या भावी मुलासाठी एखादे चांगले नाव सुचवण्यास सांगितले. पण त्या ‘आळशी’ नवऱ्याने मुलाचे नाव ठेवण्यासाठी ChatGPT चा वापर केला. त्यांने ChatGPT ला चांगली नावे सुचवण्यास सांगितले. पण हा प्रकार जेव्हा त्याच्या पत्नीला कळला, तेव्हा ती खूपच संतापली. ती नवऱ्यावर खूप रागावली आणि तिने त्याला विचारलं की ‘ बाळाचा बाप कोण आहे, तुम्ही किंवा ChatGPT ?’

या महिलेने स्वत:च या घटनेबद्दल एका मंचावर सांगितले. मार्चच्या उत्तरार्धात, तिने शहरातील एका सोशल फोरमवर एक पोस्ट केली, “मी माझ्या पतीला आमच्या बाळाचे नाव ठेवण्यास मदत करण्यास सांगितले, परंतु त्यांनी त्यासाठी ChatGPT ची मदत घेतली.” असे या पोस्टमध्ये, महिलेने नमूद केले.

हे सुद्धा वाचा

माझ्या लवकरच जन्माला येणाऱ्या बाळाचे चिनी नाव शोधण्यात तुम्ही मला मदत करू शकता का? असा प्रश्न विचारत त्याने ChatGPT ची मदत मागितली. मला आशा आहे की तो हुशार, देखणा, उंच आणि भाग्यवान असेल, असेही त्या व्यक्तीने म्हटले होते.

यानंतर ChatGPT द्वारे त्याला अनेक नाव सुचवण्यात आली होती, पण पतीला त्यापैकी कोणतेच नाव आवडले नाही. म्हणून त्याने ChatGPT ला पुन्हा दुसरी वेगळी नावं सुचवायला सांगितले. यानंतर चॅटजीपीटीने सुचवलेले नाव नवऱ्याला आवडले. आणि त्याने पत्नीला त्यांच्यापैकी एक नाव निवडण्यास सांगितले. पण पत्नीला यापैकी एकही नाव आवडले नाही. मग काय, तिला खूप राग आला, आणि तिने त्याला तो कटू प्रश्न विचारला.

आपल्या मुलाचे एखादे छान, अर्थपूर्ण नाव ठेवावे असे मला वाटले होते. पण नवऱ्याला त्या विषयी सांगितल्यावर तो तर ChatGPT कडे वळला, अशा शब्दांत राग व्यक्त करत महिलेने ही घटना आपल्या पोस्टमध्ये नमूद केली.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.