ट्विटरला दे धक्का; स्वदेशी कू अ‍ॅपची होतेय चांगलीच भरभराट; गुंतवणूकदारांकडून जमवला 218 कोटींचा निधी

नुकत्याच केलेल्या फंडींगमध्ये एक्सेल पार्टनर्स, कलारी कॅपिटल, ब्लूम व्हेंचर्स आणि ड्रीम इनक्यूबेटर या विद्यमान गुंतवणूकदारांनीही सहभाग घेतला. (Made in india Koo app is booming; Funds raised by investors are Rs 218 crore)

ट्विटरला दे धक्का; स्वदेशी कू अ‍ॅपची होतेय चांगलीच भरभराट; गुंतवणूकदारांकडून जमवला 218 कोटींचा निधी
देशी सोशल मीडिया अॅप कू करणार मोठ्या प्रमाणात नोकरभरती
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 5:43 PM

नवी दिल्ली : भारतात ट्विटरची प्रतिस्पर्धी असलेल्या कू(Koo) या स्वदेशी मायक्रो-ब्लॉगिंग साईटने टायगर ग्लोबलच्या नेतृत्वाखाली सीरीज बी फंडींगच्या माध्यमातून 30 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 218 कोटी रुपये) गोळा केले आहेत. कूने एका निवेदनात म्हटले आहे की, नुकत्याच केलेल्या फंडींगमध्ये एक्सेल पार्टनर्स, कलारी कॅपिटल, ब्लूम व्हेंचर्स आणि ड्रीम इनक्यूबेटर या विद्यमान गुंतवणूकदारांनीही सहभाग घेतला. याशिवाय आयआयएफएल आणि मिराए अ‍ॅसेट्स हे नवीन गुंतवणूकदार म्हणून उदयास आले आहेत. ट्विटरला धडक देण्यासाठी केंद्र सरकारही कू(Koo) अ‍ॅपला चांगला पाठिंबा देत आहे. (Made in india Koo app is booming; Funds raised by investors are Rs 218 crore)

या मायक्रोब्लॉगिंग साईटने आपले स्थान बळकट केले

केंद्र सरकारने अलिकडेच सोशल मीडियासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे उभारली आहेत. त्यामुळे ट्विटर ही मायक्रो-ब्लॉगिंग साईट आणि फेसबुक यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना केंद्र सरकारला उत्तर देणे भाग पाडले आहे. याचदरम्यान ‘मेड इन इंडिया’ ट्विटर म्हणून नावारुपाला आलेल्या कू(Koo) या मायक्रोब्लॉगिंग साईटने आपले स्थान बळकट केले आहे. केंद्राच्या नव्या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली असतानाच कू(Koo) या स्वदेशी मायक्रोब्लॉगिंग साईटने ही गुंतवणूक उभी केली गेली आहे. सध्याच्या घडीला कू(Koo)च्या यूजर्सची संख्या जवळपास 60 लाखांवर पोहोचली आहे. कू(Koo)ने गेल्या आठवड्यात सांगितले की, साईटकडून नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. या नव्या नियमानुसारच साईटचे गोपनीयता धोरण, वापराच्या अटी आणि सामुदायिक दिशानिर्देश असतील, असे कू(Koo) साईटच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

कू(Koo) साईटवर विविध भाषांमध्ये व्यक्त होण्याची संधी

कू(Koo) ही एक मायक्रोब्लॉगिंग साइट असून यावर आपण भारतीय भाषांमध्ये मत व्यक्त करू शकतो. अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता कमावलेल्या या व्यासपीठावर बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, कंगना राणावत, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, पियुष गोयल आणि स्मृती इराणी, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ, जेडीएसचे सर्वेसवा आणि माजी पंतप्रधान देवेगौडा, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे, भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद, जेडीयूचे नेते उपेंद्र कुशवाहा, आपचे राजेंद्र पाल गौतम, सायना नेहवाल, भाईचंग भूटिया, जवागल श्रीनाथ, मेरी कोम, दीपक हूडा तसेच क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आपली खाती तयार केली आहेत.

काय म्हणाले उन्मय राधाकृष्ण ?

कूचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उन्मय राधाकृष्ण म्हणाले, ‘कू’ला पुढील काही वर्षांतच जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नेण्याचा आमचा मानस आहे. त्याच अनुषंगाने आमची वाटचाल सुरू असून तशाच प्रकारची विविध प्रभावी पावले उचलली जात आहेत. हे उद्दीष्ट गाठण्यासाठी आम्हाला प्रत्येक भारतीयाची चांगली साथ लाभेल, अशी आशा आहे. प्रत्येक भारतीय आम्हाला इच्छित ध्येयापर्यंत लवकर पोहोचण्यास मदत करीत आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी टाइगर ग्लोबल हा एक योग्य भागीदार आहे. कंपनीने नुकतेच जवळपास 218 कोटी रुपये जमवले आहेत. फंडींगची ही नवीन फेरी प्रामुख्याने कूच्या प्लॅटफॉर्मवर सर्व भारतीय भाषांमध्ये अभियांत्रिकी, उत्पादन आणि समुदाय प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी वापरली जाणार आहे. (Made in india Koo app is booming; Funds raised by investors are Rs 218 crore)

इतर बातम्या

Breaking : मुक्ताईनगरात भाजपला धक्के सुरुच, आजी-माजी 10 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

पाच वर्षीय चिमुकली दूध घेण्यासाठी गोठ्यात गेली, 50 वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार, व्हिडीओ क्लिपमुळे संतापजनक प्रकार उघड

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.