मुंबई : प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन असतो आणि हा मोबाईल अॅपशिवाय अपूर्णच असतो. त्यामुळे गरजेचे अॅप आपण मोबाईलमध्ये डाउनलोड करतो. काही अॅपच्या माध्यमातून पैसे कमवण्याची संधी पाहून भुलून जातो. पण अनेकदा आपण कळत न कळत काही अॅप्स डाउनलोड करतो. त्यामुळे आपल्याला मोठा फटका बसण्याची शक्यता असते. कारण तुमच्या फोनमधील वैयक्तिक माहिती चोरून बँक खातं रिकामी करण्याची शक्यता असते. गुगल आपल्या माध्यमातून असे अॅप येऊ नये यासाठी काळजी घेत असतं. पण असं असूनही काही अॅपच्या माध्यमातून फटका बसण्याची शक्यता आहे. इतकंच काय तर तुमचा डेटा आणि फायनान्सिशल माहितीवरही डल्ला मारला जाऊशकतो.नुकतं थायलँड डिजिटल इकोनॉमी आणि नॅशनल सायबर सिक्युरिटी एजेन्सीनं 203 धोकादायक अॅपची यादी जाहीर केली आहे. या अॅपमधील कंटेट मालवेअर तुमच्या फोनला लक्ष करू शकतो. त्यामुळे तुमच्याकडे 203 पैकी एखादं अॅप असेल तर तात्काळ डिलीट करा.
कोणतंही अॅप डाउनलोड करण्यापूर्वी तुमच्याकडे कसली परमिशन मागते हे पाहा. त्या अॅपचा रिव्यू चेक करून घ्या. त्याचबरोबर किती लोकांनी डाउनलोड केला आहे याची आकडेवारी पाहा. तसेच अॅपचं संपूर्ण माहिती वाचून काढा.तसेच अॅपच्या नावाचं स्पेलिंग चेक करून घ्या. अनेकदा ग्रॅमाटिकल किंवा स्पेलिंग मिस्टेक करून आपली फसवणूक केली जाते. त्याचबरोबर अॅपचा लोगोही चेक करून घ्या म्हणजे आपली फसवणूक होणार नाही.