WhatsApp Status चे नवे भन्नाट फिचर आले, पाहा काय आहे सुविधा ?

व्हॉट्सअप मोबाईल एप वापरणाऱ्यांची संख्या जगात सर्वात जास्त आहे. व्हॉट्सअप चॅटींगसाठी आणि व्हिडीओ, फोटो आणि इतर कारणांसाठी वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. व्हॉट्सअपचे स्टेटस वापरणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे.

WhatsApp Status चे नवे भन्नाट फिचर आले, पाहा काय आहे सुविधा ?
Whatsapp new Feature
Follow us
| Updated on: Mar 17, 2024 | 1:19 PM

मुंबई | 17 मार्च 2024 : आता व्हॉट्सअप वापरणाऱ्यांची संख्या कोटयवधींच्या घरात आहे. मोबाईलमध्ये व्हॉट्सअप नसेल तर स्मार्टफोनचा उपयोगच नाही असे म्हटले जाते. झटपट मॅसेज, फोटो आणि व्हिडीओ पाठविण्यासाठी मोबाईलमध्ये व्हॉट्सअप डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आता व्हॉट्सअपचे स्टेटस ठेवणाऱ्यांसाठी एक खुश खबर आहे. व्हॉट्सअपने नवीन फिचर आणले आहे. व्हॉट्सअपच्या स्टेटसची मर्यादा असते. व्हॉट्सअप स्टेटस 24 तासांनंतर आपोआप डीलिट होऊन जाते. त्यामुळे आपण ज्यांनी पाहावे यासाठी स्टेटस लावलेले असते त्यांना हे पाहाता येत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी आता नवीन फिचर आले आहे. या फिचरची टेस्टींगची बराच काळापासून सुरु होते.

व्हॉट्सअप वापरकर्त्यांसाठी आता नवीन फिचर आणले आहे. WhatsApp Status Contact Mention चे ऑप्शन देण्यात आले आहे. या नव्या फिचरला आता बिटा युजर्ससाठी आणण्यात आला आहे. या नव्या फिचरच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सअप युजर्सना स्टेटसमध्ये मेन्शन करावे लागेल. त्यामुळे ज्या व्यक्तीने हे स्टेटस पाहावे त्यांना तुम्ही स्टेटस लावल्याचा नोटीफिकेशन जाणार आहे.

सध्या बिटा व्हर्जनसाठी जारी

व्हॉट्सअपच्या नव्या अपकमिंग फिचर्सची माहीती वेबसाईट Wabetainfo ने दिली आहे. हे नवीन फिचर WhatApp Android 2.24.6.19 बिटा व्हर्जनमध्ये समाविष्ट केले आहे. आपण बिटा व्हर्जन गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करू शकता. स्टेबल व्हर्जनमध्ये हे फिचर केव्हापासून लागू होईल याची माहीती अजून देण्यात आलेली नाही.

जगभरात वापरले जाते WhatsApp App

WhatsApp हे एप सर्वात मोठे मॅसेजिंग एप आहे. जगभरात या एपचा वापर 200 कोटीहून अधिक लोक करीत आहेत. या मॅसेजिंग एपमध्ये सतत नवनवीन अपडेट होत असतात. तसेच WhatsApp Status च्या प्रायव्हसीसाठी देखील खूप सारे फिचर्स आले असून जे युजर्ससाठी खूप फायद्याचे आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.