डान्स आणि झुंबासह तब्बल 30 स्पोर्ट्स मोड, Mi Band 6 बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

शाओमी ही चीनी स्मार्टफोन निर्माता आपला नवीन फिटनेस ट्रॅकर, नवीन एमआय स्मार्ट बँड 6 आज लाँच करणार आहे. (Mi Band 6)

डान्स आणि झुंबासह तब्बल 30 स्पोर्ट्स मोड, Mi Band 6 बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 5:51 PM

मुंबई : शाओमीच्या चाहत्यांसाठी 29 मार्च हा मोठा दिवस ठरणार आहे. आपली नवीन Mi 11 सिरीज लॉन्च करण्याव्यतिरिक्त, चीनी स्मार्टफोन निर्माता आपला नवीन फिटनेस ट्रॅकर, नवीन एमआय स्मार्ट बँड 6 देखील सादर करीत आहे. (Mi Band 6 launching today with 30 sports Mode and at a very low price)

Mi स्मार्ट बँड 6 शाओमीच्या ट्विटर आणि वीबो या दोन्ही चॅनेलवर टीझ केले गेले आहे. फोटोंमध्ये असे दिसून येत आहे की, या स्मार्ट बँडचं डिझाइन Mi बँड 5 प्रमाणेच असेल. तसेच यामध्ये रबर स्ट्रॅप मिळेल. तसेच Mi स्मार्ट बँड 6 मध्ये Mi स्मार्ट बँड 5 पेक्षा थोडी मोठी स्क्रीन मिळेल.

Mi Band 6 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

  1. Mi Band 6 मध्ये 1.1-इंचाचा डिस्प्ले असेल आणि Mi Band 5 प्रमाणेच डिझाइन असेल.
  2. या डिव्हाईसमध्ये 19 नवीन एक्सरसाईज मोड मिळतील, एक SpO2 सेन्सर आणि एक इनबिल्ट जीपीएस असेल. पोमोडोरो टायमरला Mi बँड 6 मध्ये एका टाइम मॅनेजमेंट मेथडशी जोडलं आहे. ज्याद्वारे 25 मिनिटं तुम्हाला कोणत्याही नोटिफिकेशनपासून दूर ठेवलं जातं.
  3. या बँडमध्ये मोठी डायल मिळण्याची शक्यता आहे. या बँडची स्क्रीन 152 x360 पिक्सल इतकी असेल. Mi Band 6 Mi होम प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या स्मार्ट होम डिव्हाईसना कंट्रोल करण्यास सक्षम असेल.
  4. Mi बँड 6 मध्ये एकूण 30 वेगवेगळे मोड मिळतील. यामध्ये Mi बँड 5 मध्ये असलेले 11 गेम्स ट्रॅकिंग कॅपेसिटी मोड्स असतीलच सोबत नवीन 11 मोड्सदेखील यात वाढवले जाणार आहेत. त्यामध्ये इनडोर फिटनेस, इनडोर आइस स्केटिंग, HIIT, कोर ट्रेनिंग, स्ट्रेचिंग, जिमनॅस्टिक, पाइलेट्स, स्ट्रीट डान्स, डान्स, झुंबाचादेखील समावेश केला जात आहे.
  5. या बँडमध्ये विशेष बाब म्हणजे हे स्मार्ट बँड अॅपवर अवलंबून नाही. या बँडमध्ये अलार्म सेट करण्याचा पर्याय मिळेल. यामध्ये स्विमिंगसाठी स्क्रीन लॉक करणे, पोमोडोरो टाइमर आणि स्मार्ट बँडद्वारे स्लीप डेटा पाहणे, याचा समावेश आहे.

Mi Band 6 संभावित किंमत

Xiaomi कंपनी Mi Band 6 ची किंमत भारतात 3,000 रुपयांपेक्षा कमी ठेवेल, असा अंदाज आहे. Mi बँड 5 ची किंमत 2,499 रुपये इतकी आहे. तर Mi Band 6 ची किंमत 40-50 डॉलर्स (2,900-3,600 रुपये).असून शकते असा अंदाज काही रिपोर्ट्समध्ये वर्तवण्यात आला आहे.

तर बातम्या

एक एप्रिलपासून महागणार आपले फेव्हरेट स्मार्टफोन, झटपट करा खरेदी

Sell Smartphone: जुना मोबाईल चांगल्या किंमतीला विकायचाय; मग ‘या’ 4 वेबसाईटस पाहाच

8GB/128GB, डुअल सेल्फी कॅमेरासह Motorola चा दमदार स्मार्टफोन लाँच, किंमत…

(Mi Band 6 launching today with 30 sports Mode and at a very low price)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.