Xiaomi चे 4 स्मार्ट टीव्ही लाँच, पाहा किंमत आणि फिचर्स
Xiaomi ने भारतात 4 नवीन स्मार्ट TV लाँच (Mi TV Launched) केले आहेत. यात 65 इंचाचा MI TV 4X फ्लॅगशिप लाँच केलं आहे.
मुंबई : Xiaomi ने भारतात 4 नवीन स्मार्ट TV लाँच (Mi TV Launched) केले आहेत. यात 65 इंचाचा MI TV 4X फ्लॅगशिप लाँच केलं आहे. यासोबतच Mi TV 4X 43, 50 आणि 40 इंचाचा टीव्ही लाँच (Mi TV Launched) केला आहे. विशेष म्हणजे शाओमीने मॉडर्न डिझाईनसोबत MI चा साऊंडबारही लाँच केला आहे. याची किंमत 4 हजार 999 रुपये आहेत. MI ने लाँच केलेले सर्व स्मार्ट टीव्ही 29 सप्टेंबरपासून विक्रीसाठी ऑनलाईन उपलब्ध असणार आहे.
Mi TV 4X 65 Inch टीव्हीचे फिचर्स
Xiaomi Mi TV 4X 65 इंचाच्या स्मार्ट टीव्हीमध्ये 4K डिस्प्लेसोबत HDR10 सपोर्ट देण्यात आलं आहे. उत्तम साऊंड क्वॉलिटीसाठी MI टीव्हीमध्ये डॉल्बी अट्मोसचा सपोर्ट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे 20 W का स्पीकरही या टीव्हीमध्ये देण्यात (Mi TV Launched) आला आहे.
यात दुसऱ्या MI TV प्रमाणे Patchwall युजर इंटरफेज देण्यात आलं असून हे पूर्णपणे अँड्राईडवर चालते. MI ने लाँच केलेल्या नव्या टीव्हीमध्ये Hotstar हे inbuilt अॅप्लिकेशनही देण्यात आलं आहे. वेबसिरीज पाहणाऱ्यांसाठी या टीव्हीमध्ये Netflix चाही सपोर्ट देण्यात आला आहे.
How big is the #MiTV65? It has 40% more surface area than our second largest (now) #MiTV, Mi TV 4 PRO 55.
Imagine watching Avengers, EPL, IPL or anything exciting on this massive 65″ 4K TV. #4KForEveryone – Bigger and better. #SmarterLiving 2020 pic.twitter.com/k7gUWhKT3W
— Mi TV India for #MiFans (@MiTVIndia) September 17, 2019
MI TV 4X मध्ये Quadcore Cortex A55 Proceesor देण्यात आलं आहे. उत्तम कनेक्टिव्हीटीसाठी यात Bluetooth 5 चा सपोर्ट देण्यात येणार आहे. MI च्या 65 इंचाच्या टीव्हीमध्ये Amazon Prime Video चा सपोर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे Amazon Prime साठी कोणत्याही थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.
तसेच MI ने यापूर्वी लाँच केलेल्या Patchwall 2.0 युजर इंटरफेजमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यात तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या लॉग-इनची गरज भासणार नाही. त्यामुळे लॉग-इन शिवाय तुम्हाला सर्व अॅप्सचा अॅक्सेस मिळू शकतो. Patchwall UI मध्ये लाईट मोडही देण्यात आला आहे.
Time for another surprise! Introducing #MiSoundbar in black!
8 speaker cinematic sound Enhanced bass Modern design Bluetooth, Aux, S/PDIF 30 sec “Easy” set-up
Isn’t it a beauty? #SmarterLiving 2020 pic.twitter.com/5mjYEOBoGG
— Mi TV India for #MiFans (@MiTVIndia) September 17, 2019
MI ने लाँच केलेल्या नव्या टीव्हीमध्ये Android 9.0 चा सपोर्ट देण्यात आला आहे. यात YouTube आणि Chromecast चा सपोर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला वेगळा Chromcast लावण्याची आवश्यकता भासणार नाही. तसेच तुम्ही मोबाईलवरुन थेट टीव्हीवर अॅप्सच्या व्हिडीओ पाहू शकता.
किंमत
- Mi TV 4X 65 : 54,999 रुपये
- Mi TV 4X 50 : 29,999 रुपये
- Mi TV 4X 43 : 24,999 रुपये
- Mi TV 4X 40 : 17,999 रुपये
Android TV Data Saver Feature:
Mi TV जगातील पहिला टीव्ही आहे, ज्यात Google चे डेटा सेव्हर देण्यात आलं आहे. यामुळे तुम्हाला टीव्हीचा डेटा लिमिट सेट करु शकता.