‘मेड इन इंडिया’चा नारा देत Micromax भारतीय बाजारात पुनरागमन करण्यासाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
स्मार्टफोनची निर्मिती करणारी भारतीय कंपनी मायक्रोमॅक्स भारतीय बाजारात जोरदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
मुंबई : स्मार्टफोनची निर्मिती करणारी भारतीय कंपनी मायक्रोमॅक्स (Micromax ) भारतीय बाजारात जोरदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीचे सहसंस्थापक राहुल शर्मा यांनी शुक्रवारी एक व्हिडीओ शेअर करत मायक्रोमॅक्सच्या पुनरागमनाची घोषणा केली आहे. सोबतच त्यांनी मायक्रोमॅक्सच्या नवीन In-सिरीजची घोषणा केली आहे. (Micromax announces comeback in smartphone market with made in india in series)
मायक्रोमॅक्सच्या या नवीन इन-सिरीज स्मार्टफोनबाबत कोणतीही अधिक माहिती देण्यात आलेली नाही. मात्र मायक्रोमॅक्सच्या या नवीन स्मार्टफोनचे नाव Micromax In 1a असं असू शकतं.
मेड इन इंडिया स्मार्टफोन राहुल शर्मा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, मायक्रोमॅक्सचा नवा स्मार्टफोन हा आत्मनिर्भर भारत अभियानाचा एक भाग असेल. या इन-सिरीजचे सर्व स्मार्टफोन मेड इन इंडिया असतील.
मायक्रोमॅक्सच्या नवीन स्मार्टफोनची किंमत आणि फिचर्स
दी मोबाईल इंडियनने दिलेल्या माहितीनुसार मायक्रोमॅक्सच्या इन-सिरीजमध्ये दोन स्मार्टफोनचा समावेश असेल. या हे दोन्ही स्मार्टफोन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाँच केले जातील. यापैकी पहिल्या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G35 प्रोसेसर आणि दुसऱ्या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर असेल. या दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत 7 ते 15 हजार रुपयांपर्यंत असेल.
मिळालेल्या माहितीनुसार MediaTek Helio G35 प्रोसेसर असलेल्या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचांचा HD+ डिस्प्ले मिळेल. हा स्मार्टफोन 2GB रॅम + 32GB स्टोरेज आणि 3GB रॅम + 32GB स्टोरेज अशा दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. या स्मार्टफोमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी असेल.
दोन जीबी रॅम असलेल्या फोनमध्ये 13+2 मेगापिक्सल्सचा डुअल रियर कॅमरा सेटअप आणि 8 मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. तर 3GB रॅम असलेल्या फोनमध्ये 13+5+2 मेगापिक्सल्सचा ट्रिपल रियर कॅमरा सेटअप असेल सोबत 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल.
We’re #INForIndia with #INMobiles! What about you? #IndiaKeLiye #BigAnnouncement #MicromaxIsBack #AatmanirbharBharat pic.twitter.com/eridOF5MdQ
— Micromax India (@Micromax__India) October 16, 2020
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाकडून शुभेच्छा
मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राहुल शर्मा यांनी व्हिडीओ शेअर केल्यानंतर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि त्याची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्ना या दोघांनी मायक्रोमॅक्सला शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षयने राहुल यांचा व्हिडीओ रिट्विट करत त्यांचा आगामी प्रवास 2.0 साठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Dear Rahul, having heard all your brilliant ideas and seeing what you’re capable of firsthand I have no doubt about the success of #InMobiles. Extremely proud of what you’ve achieved so far and journey 2.0 looks very promising. Sending all my love and best wishes ? https://t.co/oqrBEcBU7D
— Akshay Kumar (@akshaykumar) October 16, 2020
Rahul is not just a bright guy but has a self-deprecating demeanour that is so refreshing.He has made me laugh with his anecdotes and stunned me with his insights often enough. Good going @Micromax__India https://t.co/LNHNLsDsjA
— Twinkle Khanna (@mrsfunnybones) October 16, 2020
संबंधित बातम्या
Oppo चा एआय ट्रिपल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच, किंमत 10,990 रुपये, जाणून घ्या फिचर्स
iPhone च्या चाहत्यांसाठी खूशखबर! ‘या’ तीन स्मार्टफोनच्या किमतीत मोठी कपात
Samsung Galaxy M31 Prime भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन
बहुप्रतीक्षित Samsung Galaxy S20 FE चं प्री-बुकिंग सुरु, आठ हजार रुपयांपर्यंतच्या ऑफर्स
भारतात चायनीज वस्तूंच्या विक्रीत वाढ, Mi India कडून 50 लाखांपेक्षा अधिक टीव्हींची विक्री
(Micromax announces comeback in smartphone market with made in india in series )