Micromax In 1b स्मार्टफोनची विक्री रखडली, ग्राहकांना मोठी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता
मायक्रोमॅक्सने नुकतेच त्यांच्या In-सिरीजमधील दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. यापैकी एक स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असून दुसऱ्या स्मार्टफोनसाठी ग्राहकांना मोठी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.
मुंबई : मायक्रोमॅक्सने (Micromax) नुकतेच त्यांच्या In-सिरीजमधील दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. Micromax IN Note 1 आणि Micromax In 1b अशी या दोन स्मार्टफोन्सची नावं आहेत. यापैकी Micromax IN Note 1 हा स्मार्टफोन 24 नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला. तर Micromax In 1b हा स्मार्टफोन 26 नोव्हेंबरपासून विक्रीस उपलब्ध केला जाणार होता. परंतु लॉजिस्टिक कारणांनी ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. या स्मार्टफोनची विक्री कधीपासून होणार आहे, याबाबतची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. (Micromax In 1b smartphone sale delayed customers may have to wait longer)
मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राहुल शर्मा यांनी ट्विटरवरुन सांगितले की, मायक्रोमॅक्स इन 1 बी स्मार्टफोनची विक्री सुरु होण्यास थोडा वेळ आहे. मात्र शर्मा यांनी या मोबाईलच्या सेलची नेमकी तारीख स्पष्ट केलेली नाही.
Mujhe abhi khabar mili hai ki due to unforeseen circumstances hum aaj sale par nahin ja payenge! We regret the delay. Hum jaldi hi IN 1b aapke paas layenge. Apna pyaar banaye rakheyga. ? https://t.co/9tYJs77IER
— Rahul Sharma (@rahulsharma) November 26, 2020
दरम्यान, तीन दिवांपूर्वी विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या मायक्रोमॅक्स इन नोट 1 ला देशभरातील ग्राहकांची चांगलीच पसंती मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. या स्मार्टफोनची देशात इतकी मागणी वाढली आहे की, पहिल्याच सेलमध्ये अवघ्या एक दिवसात हा स्मार्टफोन आऊट ऑफ स्टॉक (Out Of Stock) झाला आहे.
मायक्रोमॅक्स इन नोट 1 हा फोन आऊट ऑफ स्टॉक झाल्यामुळे तुम्हाला खरेदी करता आला नसेल तर निराश होऊ नका. हा स्मार्टफोन 1 डिसेंबर रोजी पुन्हा एकदा विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. तसेच या फोनमध्ये दोन वर्षांचा सॉफ्टवेअर अपडेटदेखील मिळेल. मायक्रोमॅक्सने ट्विटरवरुन या फोनच्या सेलबाबतची माहिती दिली आहे. मायक्रोमॅक्सचे दोन्ही स्मार्टफोन्स ग्राहक ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट आणि मायक्रोमॅक्सइन्फो.कॉमवरील (micromaxinfo.com) फ्लॅश सेलद्वारे खरेदी करु शकतात. 1 डिसेंबरला हा फोन पुन्हा विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
Micromax In Note 1 चे स्पेसिफिकेशन्स
या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी मीडियाटेक हीलियो G85T (MediaTek Helio G85T) प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज (इंटर्नल मेमरी) स्पेस देण्यात आली आहे. तसेच 5000mAH क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे जी 18 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनमध्ये 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, सोबत 5 आणि दोन मेगापिक्सलचे अजून दोन कॅमेरे आहेत. तर 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा (सेल्फी कॅमेरा) देण्यात आला आहे.
Micromax In 1B चे स्पेसिफिकेशन्स
Micromax In 1B मध्ये 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच MediaTek चा Helio G35 प्रोसेसर देण्यात आला आहे. 13 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेकंडरी कॅमेरा हा दोन मेगापिक्सलचा आहे. तसेच सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5000mAH क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
256GB स्टोरेज आणि 64MP कॅमेरा असलेला Realme चा 5G फोन लाँचिंगच्या मार्गावर
48MP कॅमेरा, 128 GB स्टोरेज आणि डुअल स्क्रीन असलेल्या ‘या’ स्मार्टफोनवर 5000 रुपयांचा डिस्काऊंट
Honor चा 4 कॅमेरे आणि 5000mAh बॅटरी असलेला जबरदस्त फोन लाँचिंगच्या मार्गावर, जाणून घ्या फिचर्स
(Micromax In 1b smartphone sale delayed customers may have to wait longer)