Micromax In 2c Sale starts : भारतात बजेटमधला फोन झाला लॉन्च; जाणून घ्या फोनची किंमत आणि फीचर्स
Micromax In 2c मध्ये Unisoc T610 प्रोसेसर उपलब्ध आहे. तसेच, हे 3GB RAM आणि 32GB अंतर्गत स्टोरेजला सपोर्ट करते, जे microSD कार्डद्वारे 256GB पर्यंत वाढवता येते.
Micromax In 2C : आपल्याला स्मार्टफोन (Smartphone) घ्यायाचा आहे. तो ही आपल्या बजेटमध्ये तर ही संधी आपल्यासाठी चालून आलेली आहे. स्मार्टफोनमध्ये जुने असणारे नाव पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आली आहे. तेही चांगल्या फिचर्स आणि कमी किंमतीत स्मार्टफोन घेऊन. Micromax In 2c बजेट स्मार्टफोन भारतात (India) लॉन्च झाला आहे. कंपनीने अलीकडेच हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर (Flipkart) लिस्ट केला होता. मायक्रोमॅक्सने 2020 मध्ये इन सीरिजसह पुनरागमन केले होते. तेव्हापासून कंपनीने या मालिकेतील 5 मोबाईल फोन लॉन्च केली आहेत. Micromax In Note 1, In 1, In 1b, In Note 2, In 2b. इन सीरिजचा हा सहावा फोन आहे. मायक्रोमॅक्सचा हा बजेट फोन ब्राऊन आणि ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो. ज्यांना स्मार्टफोन घ्यायचा आहे. ही बातमी त्यांच्यासाठी, चला, जाणून घेऊया फोनची किंमत, फीचर्स आणि उपलब्धता. हेही वाचा – Micromax IN 2c लॉन्चची तारीख जाहीर, जाणून घ्या काय असेल खास या बजेट फोनमध्ये?
Micromax In 2c मध्ये काय खास आहे?
– 5000mAh बॅटरी – 6.52 इंच HD+ डिस्प्ले – 8MP + VGA ड्युअल रिअर कॅमेरा – UNISOC T610 – टाइप सी चार्जिंग
2c मध्ये मायक्रोमॅक्सची वैशिष्ट्ये
हा Micromax फोन 6.52-इंचाच्या HD+ डिस्प्लेसह येतो. फोनचा डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो आणि 1600 x 720 पिक्सेल रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. फोनच्या डिस्प्लेमध्ये वॉटरड्रॉप नॉच फीचर उपलब्ध आहे. फोनचा डिस्प्ले 420 nits पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो.
Unisoc T610 प्रोसेसर
Micromax In 2c मध्ये Unisoc T610 प्रोसेसर उपलब्ध आहे. तसेच, हे 3GB RAM आणि 32GB अंतर्गत स्टोरेजला सपोर्ट करते, जे microSD कार्डद्वारे 256GB पर्यंत वाढवता येते.
पहिला सेल 1 मे रोजी
फोनची किंमत 8,499 रुपये असून फोनचा पहिला सेल 1 मे रोजी दुपारी 12 वाजता ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे.