कम्प्युटर, लॅपटॉप अपग्रेड करा, विंडोज 7 लवकरच बंद होणार
मुंबई : प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्ट विंडोज 7 ला (Microsoft windows 7) सपोर्ट बंद करणार आहे. विंडोज 7 चा मेनस्ट्रिम सपोर्ट अगोदरच बंद करण्यात आलेला आहे. आता वाढवण्यात आलेला सपोर्टही (Windows extended support) बंद होणार आहे. या सिस्टममध्ये नवीन फीचर जोडणं कंपनीने यापूर्वीच बंद केलं होतं. वाढवण्यात आलेला सपोर्ट 14 जानेवारी 2020 पासून बंद होईल. विंडोज […]
मुंबई : प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्ट विंडोज 7 ला (Microsoft windows 7) सपोर्ट बंद करणार आहे. विंडोज 7 चा मेनस्ट्रिम सपोर्ट अगोदरच बंद करण्यात आलेला आहे. आता वाढवण्यात आलेला सपोर्टही (Windows extended support) बंद होणार आहे. या सिस्टममध्ये नवीन फीचर जोडणं कंपनीने यापूर्वीच बंद केलं होतं. वाढवण्यात आलेला सपोर्ट 14 जानेवारी 2020 पासून बंद होईल.
विंडोज 7 ला सपोर्ट करणं बंद झालं तरीही कम्प्युटर बंद होणार नाही. पण युझर्सना मासिक अपडेट मिळणार नाहीत. त्यामुळे कम्प्युटरला कोणतीही अडचण आल्यास कंपनीकडून मदत मिळणार नाही. विंडोज 7 चा सपोर्ट बंद झाल्यानंतर विंडोज 10 चं मार्केट मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. विंडोज 10 सुरक्षेच्या दृष्टीने जास्त अद्ययावत आहे.
विंडोज 7 बंद झाल्यानंतर नव्या सिस्टममध्ये अपग्रेड करणारांची संख्या वाढणार आहे. शिवाय नवीन सिस्टमचे पीसी घेणारे ग्राहकही वाढतील, असा अंदाज लावला जातोय.
2015 मध्ये विंडोज 10 ची लाँचिंग करण्यात आली होती. पण विंडोज 7 सुरु असल्यामुळे युझर्सने नव्या सिस्टमकडे वळण्यास उत्साह दाखवला नाही. प्रायवसीच्या दृष्टीने नव्या सिस्टममध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. विंडोज 10 सध्या 70 कोटींपेक्षा जास्त सिस्टमवर सक्रिय आहे.