SIM Card : मोबाईलधारकांसाठी महत्वाची बातमी, या तारखेपासून नवा नियम
तुम्ही जर मोबाईल सिमकार्ड अलिकडेच खराब झाल्याने किंवा चोरीला गेल्याने बदलून घेतलेले म्हणजेच स्वॅपिंग करुन घेतले असेल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. सिमकार्ड बाबत नवा नियम ट्रायने लागू केलेला आहे.
मुंबई | 17 मार्च 2024 : मोबाईलधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. मोबाईल सिमकार्ड संदर्भात नवीन नियम लागू झाले आहेत. टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडिया ( TRAY ) मोबाईलच्या सिम कार्ड संदर्भात 15 मार्च 2024 पासून नवा नियम जारी केला आहे. हा नियम येत्या 1 जुलै 2024 पासून देशभरात लागू होणार आहे. नवीन नियमांमुळे ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्यांना अटकाव करता येणार असल्याचे ट्रायचे म्हणणे आहे. परंतू या नव्या नियमाचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.
काय झाला नियम बदल
जर मोबाईलधारकांनी अलिकडेच आपल्या सिमकार्डला स्वॅप केले असेल तर ते आता आपला मोबाईल क्रमांक पोर्ट करू शकणार नाहीत. सिमच्या अदला बदलीला सिम स्वॅप म्हटले जाते. म्हणजे तुमचे सिम कार्ड खराब झाले असेल किंवा तटले असेल तर तुम्हाला सिम स्वॅप करावे लागते. आपण टेलिकॉम ऑपरेटरकडून आपले जुने सिम बदलून नवीन सिम घेण्यासाठी स्वॅपिंग करीत असतो.
काय होणार फायदा ?
नवीन नियमात तुम्ही जर सिमकार्ड स्वॅप केले असेल तर तुम्हाला नंबर पोर्ट करता येणार नाही. ट्राय हा नियम घोटाळे रोखण्यासाठी केला आहे. फ्रॉड करणाऱ्यांना सिम स्वॅपिंग किंवा रिप्लेसमेंट केल्यानंतर लागलीच मोबाईल कनेक्शनला पोर्ट करण्यापासून रोखण्यासाठी केले आहे.
काय आहे सिम स्वॅपिंग ?
मोबाईल सिम स्वॅपिंगचे घोटाळे वाढले आहेत. ज्यात फ्रॉड करणारे आपल्या पॅनकार्ड आणि आधारकार्डची फोटो सहज मिळवितात. त्यानंतर मोबाईल हरविल्याचे खोटे सांगत आपला नवीन सिमकार्ड मिळवितात. त्यानंतर तुम्हाला मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी क्रमांक फ्रॉड करणाऱ्यांपर्यंत पोहचतो. त्याचा वापर करुन ते घोटाळे करत आहेत. हे रोखण्यासाठी आता सिमकार्ड जर स्वॅपिंग केले असेल तर तुम्हाला आता नंबर पोर्ट करता येणार नसल्याचे बोलले जात आहे. येत्या 1 जुलै 2024 पासून हा नियम लागू होणार आहे.