3 जुलै रोजी महागले रिचार्ज; मग देशात SIM पोर्ट करण्याचा तुटला रेकॉर्ड, आकड्यांनी दिपतील डोळे

BSNL SIM Port : देशात मोबाईल नंबर पोर्टबिलीटी सेवा (MNP) बदलाची नवीन रेकॉर्ड झाला. 3 जुलै रोजी खासगी कंपन्यांनी रिचार्ज प्लॅन महाग केले. त्यानंतर देशात बीएसएनएलकडे ग्राहकांची रांग लागली. नंबर पोर्टबिलिटीचा विक्रम मोडीत निघाला. खासगी कंपन्यांना ग्राहकांनी चपराक दिली.

3 जुलै रोजी महागले रिचार्ज; मग देशात SIM पोर्ट करण्याचा तुटला रेकॉर्ड, आकड्यांनी दिपतील डोळे
मोबाईल क्रमांक पोर्टेबिलिटी, सिम पोर्ट
Follow us
| Updated on: Jul 28, 2024 | 4:24 PM

मोबाईल नेटवर्क सेवा पुरवठादार जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया या कंपन्यांनी 3 जुलैपासून टॅरिफ प्लॅन बदलला. त्यांनी महिन्याचा रिचार्ज प्लॅन महाग केला. त्याविरोधात देशभरातील ग्राहकांनी संताप व्यक्त केला. या दरवाढीचा निषेध म्हणून ग्राहकांनी BSNL कडे मोबाईल नंबर पोर्ट केले. बीएसएनएलकडे ग्राहकांची रीघ लागली आहे. मोबाईल पोर्टेबिलिटीचे आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत निघाले. बीएसएनएलकडे ढुंकूनही न पाहणारे ग्राहक सुद्धा आता बीएसएनएलच्या यादीत आले आहे. सिम पोर्ट करण्यात भारतीयांनी नवीन जागतिक विक्रम केला आहे.

सिम पोर्ट करण्याची सुविधा

भारतीय दूरसंचार विभागाने (DoT) मोबाईल युझर्सला विना क्रमांक बदलता नेटवर्क पुरवठादार बदलण्याची सुविधा दिली आहे. म्हणजे ग्राहक जिओचे सिम वापरत असेल तर त्याला त्याच्या आवडीनुसार, दुसर्‍या कंपनीची सेवा घेता येते. त्याला दूरसंचार पुरवठादार बदलता येतो.

हे सुद्धा वाचा

आकड्यांनी दिपतील डोळे

दूरसंचार विभागाने दिलेल्या अहवालानुसार, रिचार्ज महागल्यानंतर ग्राहकांनी त्याला सिम पोर्टने उत्तर दिले. कंपन्यांनी 3 जुलै रोजी रिचार्ज प्लॅन महागले. 6 जुलै रोजीपर्यंत मोबाईल नंबर पोर्टबिलिटी सेवाने 100 कोटींचा आकडा पार केला. MNP सेवा भारतात 20 जानेवारी 2011 रोजी सुरु झाली होती. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानुसार, (TRAI) भारतात सरासरी प्रत्येक महिन्याला जवळपास 1.1 कोटी मोबाईल सिम पोर्ट करण्यासाठी विनंती येते.

ट्रायच्या आकडेवारीनुसार, 6 जुलै, 2024 रोजी भारताने पोर्टिबिलिटीमध्ये नवीन रेकॉर्ड केला आहे. भारताने आतापर्यंत 100 कोटींचा आकडा गाठला. मे 2024 मध्ये 1.2 कोटी मोबाईल क्रमांक पोर्ट करण्यात आले होते. मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी ग्राहकांना 7 दिवसांची प्रतिक्षा करावी लागते.

खासगी कंपन्यांनी किती वाढवले दर

खासगी कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या दरात मोठी वाढ केली. प्लॅनचे दर 11% ते 25% वाढविण्यात आले. एअरटेल, व्होडाफोनचे 28 दिवसांचा सर्वात स्वस्त प्लॅन यापूर्वी 199 रुपयांना होता. तर जिओचा प्लॅन 189 रुपये होता. त्या तुलनेत बीएसएनएलचा प्लॅन फक्त 108 रुपयांमध्ये आहे. तसेच 107 रुपये ते 199 रुपयांपर्यंत बीएसएनएलचे 4-5 प्लॅन आहेत. ते इतर कंपन्यांच्या प्लॅनच्या तुलनेत स्वस्त आहेत. खासगी दूरसंचार कंपन्यांनी रिचार्ज प्लॅन वाढवल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर तर या कंपन्यांच्याविरोधात मोहिमच सुरु झाली आहे. बीएसएनएल सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.