देशविरोधी कंटेंटला चाप, 4 पाकिस्तानी अकाऊंटसह 22 YouTube चॅनेलवर मोदी सरकारची कारवाई
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आयटी नियम 2021 (IT Rules 2021) अंतर्गत आणीबाणीच्या शक्तीचा वापर करून, 22 YouTube चॅनेल, तीन ट्विटर (Twitter) अकाऊंट्स, एक फेसबुक अकाऊंट आणि एक न्यूज वेबसाइट ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत.

नवी दिल्ली : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आयटी नियम 2021 (IT Rules 2021) अंतर्गत आणीबाणीच्या शक्तीचा वापर करून, 22 YouTube चॅनेल, तीन ट्विटर (Twitter) अकाऊंट्स, एक फेसबुक अकाऊंट आणि एक न्यूज वेबसाइट ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. ब्लॉक केलेल्या युट्यूब (YouTube) चॅनेलची एकूण 260 मिलियन इतकी व्ह्यूअरशिप होती. ही खाती (अकाऊंट्स) आणि चॅनेल्स सोशल मीडियावर संवेदनशील आणि खोटी माहिती पसरवण्यासाठी तसेच भारताची सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित खोट्या बातम्या पसरवण्यासाठी वापरली जात होते. IT Rules 2021 च्या आधारे भारतीय YouTube चॅनेल्सवर कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सरकारने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये IT नियम 2021 ची अधिसूचना जारी केली होती. ताज्या ब्लॉकिंग आदेशानुसार, 18 भारतीय आणि 4 पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी घालण्यात आली आहे.
या यूट्यूब चॅनेलचा वापर विविध मुद्द्यांवर खोट्या बातम्या पसरवण्यासाठी केला जात होता. विशेषत: भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीरसारख्या मुद्द्यांवर या वाहिन्यांद्वारे बनावट पोस्ट टाकल्या जात होत्या, तसेच यावर चुकीची माहिती शेअर केली जात होती. दरम्यान. विविध सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट करण्यात येणारा भारतविरोधी मजकूरही ब्लॉक करण्यात आला आहे. युक्रेनमधील परिस्थितीबाबत मोठ्या प्रमाणात चुकीची माहिती भारतीय यूट्यूब चॅनलद्वारेही शेअर केल्याचे तपासात आढळून आले आहे. भारताच्या इतर देशांसोबतच्या संबंधांवर परिणाम करण्याच्या उद्देशाने या चॅनेल्सवर पोस्ट केल्या जात होत्या.
कोणत्या चॅनेल्सवर बंदी
ARP News, AOP News, LDC News, Sarkari Babu, SS ZONE Hindi, Smart News, News23 Hindi, Online Khabar, DP news, PKB News, Kisan Tak, Borana News, Sarkari News Update, Bharat Mausam, RJ ZONE 6, Exam Report, Digi Gurukul,
कारवाई करण्यात आलेले पाकिस्तानी चॅनल्स
Duniya Mery Aagy, Ghulam Nabi Madni, HAQEEQAT TV, HAQEEQAT TV 2.0
वेबसाइट्स : Dunya Mere Aagy
सोशल मीडिया अकाउंट
ट्विटर – Ghulam Nabi Madni, Dunya Mery Aagy, Haqeeqat TV
फेसबुक – Dunya Mery Aagy
इतर बातम्या
150W अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास
Apple Down : ॲपलच्या सेवा ठप्प, App Store, Music सह अनेक ॲप्सवर परिणाम
क्वाड कॅमेरा सेटअपसह Samsung चा 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स