चार्जर शोधण्याची झंझटच नाही; सर्व कंपन्यांच्या मोबाईलसाठी मोदी सरकार एकच चार्जर वापरात आणणार

चार्जर शोधण्याच्या झंझटपासून मुक्तता मिळणार आहे. सर्व कंपन्यांच्या मोबाईल साठी एकच चार्जर वापरात आणण्याचा मोदी सरकारचा(Modi government ) प्रयत्न आहे. यामुळे येत्या काळात सर्व मोबाईल ला एकच चार्जर लागेल अशा प्रकारचे चार्जर उपलब्ध करून दिले जाणार आहे.

चार्जर शोधण्याची झंझटच नाही; सर्व कंपन्यांच्या मोबाईलसाठी मोदी सरकार एकच चार्जर वापरात आणणार
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 11:25 PM

नवी दिल्ली : अन्न, वस्त्र निवाऱ्याप्रमाणे आता मोबाईल देखील माणसाची मूलभूत गरज बनली आहे असचं म्हणाव लागेल. मोबाईलसह चार्जर(mobile charger) देखील महत्त्वाचा भाग बनला आहे. कारण चार्जरशिवाय मोबाईल सुरुच होऊ शकत नाही. मात्र वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांचे चार्जर वेगवेगळे असतात. यामुळे बऱ्याचदा अडचणींचा सामना करावा लागतो विशेषतः सोबत चार्जर नसल्यास अथवा कुठे बाहेर गेल्यात चार्जरची शोधा शोध करावी लागले. मात्र, आता चार्जर शोधण्याच्या झंझटपासून मुक्तता मिळणार आहे. सर्व कंपन्यांच्या मोबाईल साठी एकच चार्जर वापरात आणण्याचा मोदी सरकारचा(Modi government ) प्रयत्न आहे. यामुळे येत्या काळात सर्व मोबाईल ला एकच चार्जर लागेल अशा प्रकारचे चार्जर उपलब्ध करून दिले जाणार आहे.

सध्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या मोबईलचे चार्जर देखील वेगवेगळे आहेत. यामुळे सर्व प्रकारच्या मोबाईलसाठी एकाच डिझाइनचा चार्जर असावा याची तयारी केंद्र सरकार करत आहे. यासाठी सरकारने उद्योगांना पत्र लिहून 17 ऑगस्ट रोजी बैठक बोलावली आहे. इलेक्ट्रॉनिक गॅझेट दोन प्रकारात विभागून त्यांच्यासाठी एकसमान सामान्य चार्जर ठेवता येईल का हा बैठकीचा अजेंडा आहे. जे मोठ्या आकाराचे गॅझेट आहेत. लॅपटॉप आणि टॅब इ. त्यांच्यासाठी श्रेणी सेट करून एकसमान डिझाइनचे चार्जर असू उपलब्ध करुन देण्याची योजना आहे.

मोबाईल फोनसह, इअरबड्स, हेडफोन्स, स्मार्टवॉच, हेल्थ गॅजेट्स आणि स्पीकर यांसारख्या लहान किंवा मध्यम आकाराच्या गॅझेट्ससाठी एक प्रकारची चार्जिंग सिस्टीम असावी. यासाठी टाइप-सी चार्जर असावा. यासोबतच प्रीमियम उपकरणांसाठी वेगळा चार्जर असावा यावर चर्चा करण्यासाठी सरकारने 17 ऑगस्टला महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

सर्व प्रकारच्या गॅझेट्ससाठी समान Type-C चार्जर असावे यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचा चार्जर वापरात आल्यास मोठ्या प्रमाणात होणारा ई-कचरा रोखण्यास मदत होईल, असा सरकारचा विश्वास आहे. यामुळे प्रत्येक वेळी चार्जर खराब झाल्यावर नवीन चार्जर खरेदी करण्याची गरज भासणार नाही. वेगवेगळ्या प्रकारचे चार्जर सोबत ठेवण्याच्या त्रासातुन देखील सुटका होणार आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.