नवी दिल्ली | 17 डिसेंबर 2023 : युपीआयमुळे व्यवहार करणे अत्यंत सोपे आणि जलद झाले आहे. तुम्ही अगदी सहज कोणत्याही मोबाईल क्रमांकावर सहज रक्कम हस्तांतरीत करु शकता. पण युपीआय व्यवहार करताना घाई गडबडीत दुसऱ्याच खात्यावर रक्कम हस्तांतरीत होते. व्यवहार झटपट होत असल्याने कधी कधी अशी चूक होते. मग रक्कम परत कशी मिळवायची असा प्रश्न सतावतो. ही रक्कम परत मिळेल की नाही, अशी पण चिंता लागते. कारण नंबर जर चुकला तर ती व्यक्ती आपल्या ओळखीची नसते. त्यामुळे ही रक्कम परत मिळेल की नाही? ही चिंता सतावते. अशावेळी ही टिप्स तुम्हाला उपयोगी पडू शकते. तुमची रक्कम परत मिळू शकते. ही रक्कम परत मिळण्याची पद्धत सोपी आहे.
असा दिला दिलासा
रबीआयने युपीआय पेमेंटविषयी एक जोरदार निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ग्राहकांना आता 1 लाखांहून थेट 5 लाख रुपयांपर्यंतचा व्यवहार युपीआयद्वारे करता येईल. पण ही सुविधा सर्रास सर्वच युपीआय व्यवहारांसाठी लागू नाही. काही व्यवहारांसाठीच ही सुविधा लागू करण्यात आली आहे. आरबीआयच्या या सुविधेचा लाभ केवळ हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्थांना मिळेल. या ठिकाणी युपीआय पेमेंटच्या माध्यमातून 5 लाख रुपयांपर्यंत व्यवहार करता येईल. त्यामुळे युपीआयचा वापर वाढेल असे आरबीआयने स्पष्ट केले. यामुळे अनेकांना आता शाळा, महाविद्यालयाचे शुल्क सोप्यारित्या युपीआयच्या माध्यमातून करता येईल.
करा गुगलवर हे सर्च