6000mAh बॅटरी, 48MP ट्रिपल कॅमेरा, कॅशबॅक ऑफरसह POCO M3 खरेदी करा

POCO India कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीला भारतात नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केला आहे. POCO M3 असं या फोनचं नाव आहे.

6000mAh बॅटरी, 48MP ट्रिपल कॅमेरा, कॅशबॅक ऑफरसह POCO M3 खरेदी करा
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 11:07 AM

मुंबई : POCO India कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीला भारतात नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनचं नाव POCO M3 असं असून हा स्मार्टफोन ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. विक्रीसाठी उपलब्ध होताच काही वेळातच हा फोन आऊट ऑफ स्टॉक झाला होता. त्यानंतर हा फोन आज पुन्हा एकदा विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे. (more opportunity to buy POCO M3 at cashback and discount sale starting today at 12 noon on flipkart)

POCO M3 हा स्मार्टफोन आज दुपारपासून Flipkart या ई-कॉमर्स साईटवर विक्रीसाठी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. हा स्मार्टफोन 2 फेब्रुवारी रोजी लाँच करण्यात आला होता. 9 फेब्रुवारीला या फोनचा पहिला सेल आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर काही वेळात या फोनच्या सर्व युनिट्सची विक्री झाल्यामुळे हा फोन आऊट ऑफ स्टॉक झाला होता. त्यानंतर 16 फेब्रुवारीला याचा सेल आयोजित करण्यात आला होता. तेव्हादेखील याचे अनेक वेरिएंट्स आऊट ऑफ स्टॉक झाले होते. आजपासून हा स्मार्टफोन पुन्हा एकदा विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे फ्लिपकार्टने या फोनसोबत अनेक कॅशबॅक ऑफर्सही सादर केल्या आहेत.

कॅशबॅक ऑफर

कंपनीने POCO M3 स्मार्टफोनचे दोन वेरिएंट्स सादर केले आहेत. ज्यामध्ये 6GB RAM आणि 64GB स्टोरेज स्पेस असलेल्या स्मार्टफोनची किंमत 10,999 रुपये इतकी आहे, तर 6GB RAM आणि 128GB स्टोरेज स्पेस असलेल्या स्मार्टफोनची किंमत 11,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662G प्रोसेसरवर चालतो. हा फोन खरेदी करताना तुम्ही Flipkart Axis Bank Credit Card चा वापर केलात तर तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक ऑफर मिळेल. जर तुम्ही बँक ऑफ बडोदाच्या मास्टकार्ड डेबिट कार्डद्वारे पेमेंट केलंत तर तुम्हाला 10 टक्के डिस्काऊंट मिळेल. परंतु या कार्डद्वारे केलेलं हे पहिलं ट्रान्झॅक्शन असलं पाहिजे, कंपनीने या ऑफरसह काही नियम आणि अटीदेखील सांगितल्या आहेत (Bank of Baroda Mastercard debit card first time transaction). याची माहिती तुम्हाला फ्लिपकार्टवरील पोको एम 3 च्या पेजवर मिळेल.

भारतीय मार्केटमध्ये धुमाकूळ

POCO M3 एक्सक्लूसिव्हली ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. कंपनीने हा फोन कूल ब्लू, पॉवर ब्लॅक आणि येल्लो या कलर ऑप्शन्ससह लाँच केला आहे. या फोनचा टीझर पाहिल्यानंतर युजर्समध्ये या स्मार्टफोनबाबत खूप क्रेझ निर्माण झाली होती. कंपनीने POCO M3 हा स्मार्टफोन इंडोनेशियात आधीच लाँच केला होता. तेव्हापासून या फोनबाबत भारतीय युजर्समध्ये मोठी उत्सुकता होती. त्यामुळे हा फोन भारतीय युजर्सच्या पसंतीस उतरेल आणि याची मोठ्या प्रमाणात विक्री होईल, असे अंदाज वर्तवण्यात येत होते. अपेक्षेप्रमाणे या फोनने भारतीय मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे.

जबरदस्त फीचर्स

Poco M3 या स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचा डिस्प्ले वॉटरड्रॉप स्टाईल नॉचसह सादर करण्यात आला आहे. पोको एम 3 स्मार्टफोन गुगलच्या अँड्रॉयड 11 ऑपरेटिंग सिस्टिम बेस्ड एमआययूआय वर आधारित आहे. फोनमध्ये 6000 MAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. पोको एम 3 स्मार्टफोन OnePlus 8T Cyberpunk 2077 स्पेशल एडिशन प्रमाणे डिझाइन करण्यात आलेला आहे. फोन ड्युअल टोन फिनिश आणि पोको ब्रँडिंग कॅमेर्‍यासह सादर करण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी Poco M3 या स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा बॅक कॅमेरा (रियर कॅमेरा) देण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये 2 एमपी मॅक्रो लेन्स आणि 2 एमपी डेप्थ सेंसर सपोर्ट आहे. फोनच्या फ्रंट पॅनलवर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सला कॅमेरा देण्यात आला आहे.

हेही वाचा

40% डिस्काऊंटसह Samsung, Oneplus, Xiaomi, Apple चे स्मार्टफोन्स खरेदी करा

ट्रिपल कॅमेरासह Redmi 9 Power चं 6GB रॅम वेरिएंट भारतात लाँच, किंमत…

64MP Quad Camera, 7000mAh बॅटरी, इन्स्टंट डिस्काऊंटसह Samsung Galaxy F62 चा पहिला सेल

(more opportunity to buy POCO M3 at cashback and discount sale starting today at 12 noon on flipkart)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.