5000mAh बॅटरी, 6.5 इंच डिस्प्ले, किंमत अवघी 7499, Moto चा दमदार स्मार्टफोन लाँच
मोटोरोला (Motorola) कंपनीने अखेर त्यांचा बहुप्रतीक्षित मोटो ई 7 पॉवर (Moto E7 Power) हा स्मार्टफोन लाँच केला आहे.
मुंबई : मोटोरोला (Motorola) कंपनीने अखेर त्यांचा बहुप्रतीक्षित मोटो ई 7 पॉवर (Moto E7 Power) हा स्मार्टफोन लाँच केला आहे. Moto E7 Power हा स्मार्टफोन मोटोने एंट्री-लेव्हल सेगमेंटमध्ये सादर केला आहे. Moto च्या E7 सिरीजमधील हा तिसरा स्मार्टफोन आहे. यापूर्वी कंपनीने या सिरीजमध्ये Moto E7 आणि Moto E7 प्लस हे स्मार्टफोन लाँच केले आहेत. (Moto E7 Power launched with 5000mAh battery and interesting features price details)
Moto E7 Power हा मोटोरोलाचा पहिला असा स्मार्टफोन आहे जो पूर्णपणे भारतात बनवण्यात आला आहे. तसेच हा स्मार्टफोन खूपच स्वस्त आहे. दरम्यान, हा स्मार्टफोन आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये लाँच केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु कंपनीने या बातमीला अजून दुजोरा दिलेला नाही. दरम्यान, Moto E7 Power हा स्मार्टफोन 26 फेब्रुवारी दुपारी 12:00 वाजल्यापासून एक्सक्लूझिव्हली फ्लिपकार्ट आणि प्रमुख रिटेल स्टोर्सवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. चला तर मग जाणून घेऊयात या दमदार फोनची वैशिष्ट्ये.
Moto E7 Power ची किंमत
मोटोरोला मोटो ई 7 Power हा स्मार्टफोन भारतात दोन वेगवेगळ्या वेरियंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 4 जीबी रॅम आणि 2 जीबी रॅम वेरियंटचा समावेश आहे. या दोन्ही वेरियंटची किंमत अनुक्रमे 8,299 रुपये आणि 7,499 रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन ब्लू आणि कोरल रेड या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Moto E7 Power चे स्पेसिफिकेशन्स
मोटोरोलाने आधीच फ्लिपकार्ट वर Moto E7 Power या स्मार्टफोनचे ऑफिशियल फीचर्स शेअर केले आहेत. या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचांचा एचडी + मॅक्स व्हिजन डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फ्रंट कॅमेरासाठी या फोनच्या डिस्प्लेमध्ये वॉटरड्रॉप नॉच देण्यात आला आहे. Moto E7 Power एक ऑक्टा-कोर SoC डिव्हाईस आहे जे 4 जीबी च्या LPDDR4X रॅमसोबत सादर करण्यात आलं आहे. तसेच हा फोन 64 जीबी इंटर्नल स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. या फोनची स्टोरेज स्पेस मायक्रो एसडी कार्डद्वारे तब्बल 1 टीबीपर्यंत वाढवता येईल.
या फोनच्या ऑप्टिक्सबाबत बोलायचे झाल्यास मोटो ई 7 Power च्या रियर पॅनलवर एक डुअल-कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. कॅमेरा मॉड्यूलमध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर देण्यात आला आहे. फोटो क्वालिटीसाठी अजून एक सेंसर आहे. सोबत एलईडी फ्लॅशचा समावेश करण्यात आला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
या स्मार्टफोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरीदेखील देण्यात आली आहे. जी यूएसबी टाइप-सी पोर्टद्वारे चार्ज करता येईल. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 2×2 MIMO वाय-फाय नेटवर्क सपोर्ट, 3.5 मिमी हेडफोन जॅकचा सपोर्ट आहे.
डिस्प्ले आणि प्रोसेसर
Display Size |
|
Resolution |
|
Resolution Type |
|
Operating System |
|
Processor Type/Processor Core |
|
स्टोरेज आणि कॅमेरा
Internal Storage |
|
RAM |
|
Primary Camera |
|
Secondary Camera |
|
Network Type |
|
Introducing, the #PowerpackedEntertainer #motoe7power that will change the way you experience entertainment with its power-packed features. Starting from just ₹7,499! Available on @Flipkart & at leading retail stores from 26th Feb, 12 PM. Save the date! https://t.co/oXGLp45rQt pic.twitter.com/8GsID51uqr
— Motorola India (@motorolaindia) February 19, 2021
हेही वाचा
7,199 रुपयांचा स्मार्टफोन अवघ्या 599 रुपयात, कंपनीकडून ऑफर्सचा धमाका
5000 हून कमी आहे सॅमसंग आणि Nokia च्या धमाकेदार फोनची किंमत, मिळणार जबरदस्त फीचर्स
(Moto E7 Power launched with 5000mAh battery and interesting features price details)