6.5 इंच डिस्प्ले, 5000mAh बॅटरी आणि किंमत खूपच कमी, Moto स्मार्टफोनच्या लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

मोटोरोलाचा हा नवा स्मार्टफोन केवळ फ्लिपकार्टवरील टीझरमध्ये पाहावयास मिळाला आहे. या फोनची किंमत 10 हजाराहून कमी असेल.

6.5 इंच डिस्प्ले, 5000mAh बॅटरी आणि किंमत खूपच कमी, Moto स्मार्टफोनच्या लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 11:57 AM

मुंबई : Motorola कंपनीचा मोटो ई 7 पॉवर (Moto E7 Power) हा स्मार्टफोन आज (19 फेब्रुवारी) भारतात लाँच केला जाणार आहे. मोटोरोलाचा हा नवा स्मार्टफोन केवळ फ्लिपकार्टवरील टीझरमध्ये पाहावयास मिळाला आहे. दरम्यान लीक्सच्या माध्यमातून या फोनमधील स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि बॅटरीबाबतची माहिती समोर आली आहे. (Moto E7 Power to Launch in India Today via Flipkart: know Price, Specifications)

आतापर्यंत मोटोरोलाने त्यांच्या ई सिरीजमधील स्मार्टफोन खूपच किफायतशीर किंमतीत सादर केले आहेत. Moto E7 Power हा स्मार्टफोनदेखील किफायतशीर किंमतीत सादर केला जाणार आहे. असं म्हटलं जातंय की या फोनची किंमत 10 हजार रुपयांहून कमी असण्याची शक्यता आहे. लीक्सनुसार मोटो E7 पॉवर हा स्मार्टफोन भारतात 5000mAh च्या बॅटरीसह लाँच केला जाण्याची शक्यता आहे.

Moto E7 Power या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो G25 चिपसेट दिला जाईल. सध्या या फोनबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. परंतु लीक्समधील माहितीनुसार या फोनमध्ये जबरदस्त फीचर्स मिळतील, असा अंदाज बांधला जातोय. हा स्मार्टफोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह सादर केला जाण्याची शक्यता काही रिपोर्ट्समध्ये वर्तवण्यात आली आहे. तसेच याची स्टोरेज स्पेस मायक्रो एसडी कार्डद्वारे तब्बल 1 टीबीपर्यंत वाढवता येईल.

फीचर्स

Moto E7 Power या फोनमध्ये 6.5 इंचांचा HD+ डिस्प्ले दिला जाईल जो वॉटड्रॉप नॉचसह सादर केला जाईल. यामध्ये स्टँडर्ड 60Hz चा रिफ्रेश रेट दिला जाईल. रिपोर्टमध्ये म्हटलं गेलं आहे की, या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो G25 चिपेसट दिला जाईल. फोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह लाँच होऊ शकतो. या फोनमध्ये कंपनीकडून 5000mAh क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते.

हा स्मार्टफोन अँड्रॉयड 10 OS वर काम करेल. या फोनच्या कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास या फोनमध्ये 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. सोबत सेल्फीसाठी 5 मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा मिळेल. कंपनीने अद्याप या फोनच्या किंमतीबाबत खुलासा केलेला नाही. असं म्हटलं जातंय की, या फोनची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते.

हेही वाचा

7,199 रुपयांचा स्मार्टफोन अवघ्या 599 रुपयात, कंपनीकडून ऑफर्सचा धमाका

5000 हून कमी आहे सॅमसंग आणि Nokia च्या धमाकेदार फोनची किंमत, मिळणार जबरदस्त फीचर्स

(Moto E7 Power to Launch in India Today via Flipkart: know Price, Specifications)

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.