ट्रिपल कॅमेरा आणि जबरदस्त बॅटरीसह भारतातला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन विक्रीस उपलब्ध

भारतातला सर्वात स्वस्त 5 जी स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. Moto G 5G असं या स्मार्टफोनचं नाव आहे.

ट्रिपल कॅमेरा आणि जबरदस्त बॅटरीसह भारतातला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन विक्रीस उपलब्ध
Follow us
| Updated on: Dec 13, 2020 | 6:09 PM

मुंबई : मोटोरोला (Motorola) कंपनीने भारतात किफायतशीर 5G फोन लाँच केला आहे. मोटोरोला कंपनी या फोनद्वारे 5 जीमध्ये डेब्यू करत आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 20,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 5 जी सपोर्टसह या फोनमधील, प्रोसेसर आणि किंमत या फोनचं मुख्य आकर्षण आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 750G प्रोससर देण्यात आला आहे. आतापर्यंत भारतात जे 5G फोन उपलब्ध आहेत. Moto G 5G हा त्यापैकी सर्वात स्वस्त 5G फोन आहे. हा फोन सध्या फ्लिपकार्टवर विक्रीस उपलब्ध आहे. (Moto G 5G : India’s cheapest 5G smartphone with triple camera and powerful battery awailable for sale)

भारतात सध्या 5 जी नेटवर्क उपलब्ध नाही. परंतु, पुढील एक-दोन वर्षात 5 जी नेटवर्क भारता लाँच होऊ शकतं. त्यामुळे युजर्सना 5 जी स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास Moto G 5G हा फोन उत्तम पर्याय आहे. स्लॅशलिक्सने दिलेल्या माहितीनुसार मोटो G 5G मध्ये फुल्ल स्क्रीन डिस्प्लेवाला पंच होल कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन स्टॉक अँड्रॉयड UI आणि प्री लोडेड मोटोरोला अॅप्लिकेशन्सवर चालेल. या फोनमध्ये डेडिकेटेड गुगल असिस्टंट बटण देण्यात आलं आहे. Moto G 5G मध्ये क्वालकॉमचा नव्या स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर देण्यात आला आहे. क्वालकॉमने यापूर्वी सप्टेंबरमध्ये हा चिपसेट लाँच केला आहे. स्नॅपड्रॅगन 750G स्नॅपड्रॅगन 730G पेक्षा 20 टक्के अधिक चांगला आहे.

या फोनमध्ये 6.66 इंचांचा डिस्प्ले (2100*1080p) देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 60Hz इतका आहे. फोनमध्ये मागच्या बाजूला तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. त्यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर असून 8 मेगापिक्सलचा टेलिफोटो सेन्सर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा (फ्रंट कॅमेरा) देण्यात आला आहे. फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इतकी इंटर्नल मेमरी (इंटर्नल स्टोरेज स्पेस) देण्यात आली आहे. ही मेमरी मायक्रो एसडी कार्डद्वारे वाढवता येईल. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

256GB स्टोरेज आणि 64MP कॅमेरा असलेला Realme चा 5G फोन लाँचिंगच्या मार्गावर

Realme ही चिनी स्मार्टफोन कंपनी गेल्या वर्षभरापासून देशातील अनेक मोठ्या स्मार्टफोन कंपन्यांना जोरदार टक्कर देत आहे. कंपनीने आता भारतात X7 सिरीज लाँच करण्याचे ठरवले आहे. X7 सिरीज कधी लाँच होणार याबाबतची कोणतीही माहिती कंपनीने जाहीर केली नसली तरी हा फोन पुढील वर्षी जानेवारी महिन्यात लाँच केला जाऊ शकतो, असे म्हटले जात आहे. या सिरीजमध्ये दोन स्मार्टफोन असणार आहेत. X7 आणि X7 प्रो अशी या स्मार्टफोनची नावं असतील.

रियलमी X7 या फोनमध्ये तुम्हाला 6.55 इंचांचा सुपर एमोलेड डिस्प्ले मिळेल. यामध्ये तुम्हाला 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज स्पेस दिली जाईल. ही मेमरी मायक्रो एसडी कार्डद्वारे वाढवता येईल. कॅमेऱ्याच्या बाबतीतही हा फोन दमदार आहे. या फोनमध्ये 64 मेगापिक्सेल्सचा सोनीचा IMX686 प्रायमरी सेन्सर दिला जाणार आहे. तसेच 8 मेगापिक्सेलचा अजून एक सेन्सर, 2 मेगापिक्सेलचा पोट्रेट सेन्सर, 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर दिला जाईल. तसेच सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा (सेकंडरी कॅमेरा) दिला जाईल. तसेच फोनमध्ये 4500mAh क्षमतेची बॅटरी दिली जाणार आहे.

इतर बातम्या

2021 हे वर्ष फोल्डेबल स्मार्टफोन्सचं, ‘या’ कंपन्या भारतात दमदार स्मार्टफोन्स लाँच करणार

Amazon Sale : अवघ्या 23 हजारात आयफोन, सेलमध्ये आयपॅड आणि मॅकबुकचाही समावेश

(Moto G 5G : India’s cheapest 5G smartphone with triple camera and powerful battery awailable for sale)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.