48MP कॅमेरा, 6,000 mAh बॅटरी, किंमत फक्त 9999, Moto चा दमदार फोन लाँच
तुमचं बजेट 10 हजार रुपयांच्या आसपास असेल तर तुम्ही या बजेटमध्ये दमदार फीचर्सनी सुसज्ज असा मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन खरेदी करु शकता.
मुंबई : मोटोरोलाने (Motorola) भारतीय बाजारात दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. तुमचं बजेट 10 हजार रुपयांच्या आसपास असेल तर तुम्ही या बजेटमध्ये दमदार फीचर्सनी सुसज्ज असा मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन खरेदी करु शकता. मोटोरोलाने मोटो जी 30 (Moto G30) आणि मोटो जी 10 पॉवर (Moto G10 Power) असे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. मोटोरोला कंपनी मोटो जी 10 (Moto G10) या स्मार्टफोनची मोटो जी 10 पॉवर (Moto G10 Power) या नावाने भारतीय बाजारात विक्री करेल. हा फोन कंपनीने युरोपियन मार्केटमध्ये Moto G10 नावाने लाँच केला होता. (Moto G30 and Moto G10 Power launched ind India, know price and feature)
Moto G30 आणि Moto G10 हे दोन स्मार्टफोन लाँच करताच कंपनीने दोन्ही स्मार्टफोन फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साईटवर लिस्ट केले आहेत. हा स्मार्टफोन स्टॉक अँड्रॉयड 11 आउट ऑफ द बॉक्ससह सादर करण्यात आले आहेत. G30 दोन कलर ऑप्शनसह सादर करण्यात आला आहे ज्यामध्ये पेस्टल स्काय आणि फँटम ब्लॅक या रंगांचा समावेश आहे. तर G10 Power हा स्मार्टफोन अरोरा ग्रे आणि इरिड्स पर्ल कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. Moto G30 च्या सेलबाबत बोलायचे झाल्यास, दोन्ही फोन 17 मार्चपासून Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध असतील. तसेच Moto G10 Power फ्लिपकार्टवर 16 मार्च दुपारी 12 वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध असेल.
Moto G30 मध्ये काय आहे खास?
मोटो जी 30 मध्ये 6.5 इंचाचा एचडी + डिस्प्ले आहे, जो 720 × 1,600 पिक्सेलसह सादर करण्यात आला आहे ज्याचा रिफ्रेश रेट 90 × 90 इतका आहे. या फोनच्या फ्रंट पॅनलवर वॉटरड्रॉप नॉच आहे ज्यामध्ये सेल्फी कॅमेरा सेन्सर आहे. मोटो जी 30 स्नॅपड्रॅगन 662 SoC प्रोसेसरने (Snapdragon 662 Processor) सुसज्ज आहे ज्यात 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे ही स्पेस वाढवता येऊ शकते.
या फोनच्या रियर पॅनलवर क्वाड-कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यामध्ये 64-मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि दोन 2-मेगापिक्सलचा मॅक्रो शॉट्स सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 20W चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh क्षमतेची बॅटरी आहे. या स्मार्टफोनची किंमत 10,999 रुपये आहे.
Capture moments or create your own; when you have #motog30 that comes with a 64MP Quad Camera, ThinkShield for mobile, Android™ 11, 90Hz 6.5″ Display & more. Grab your #SolidAllRounder at just ₹10,999 from 17th Mar, 12 PM on @Flipkart. https://t.co/Jsbzm0TIDL pic.twitter.com/PAfFoGCeBo
— Motorola India (@motorolaindia) March 9, 2021
Moto G10 Power के स्पेसिफिकेशन्स
मोटो जी 10 बद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन मोटो जी 30 पेक्षा थोडा स्वस्त आहे. स्मार्टफोनमध्ये 60 हर्ट्ज रीफ्रेश रेटसह 6.5 इंचाचा एचडी + डिस्प्ले आहे. मोटो जी 10 स्नॅपड्रॅगन 460 SoC (Snapdragon 460 Processor) प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 48 मेगापिक्सलचा सेन्सर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि दोन 2 मेगापिक्सेल सेन्सर असलेला क्वाड-कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये 6,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनची किंमत 9,999 रुपये आहे.
You wanted to explore more. You got it with #motog10power that comes with a 6000 mAh battery, 48MP Quad Camera, ThinkShield for mobile, Android™ 11 & more. Grab your #PowerfulAllRounder at just ₹9,999 from 16th Mar, 12 PM on @Flipkart. https://t.co/O76bXB2Q6f pic.twitter.com/BZnsFQk2ie
— Motorola India (@motorolaindia) March 9, 2021
इतर बातम्या
मूनशॉट फीचरसह दमदार कॅमेरा, ‘या’ दिवशी लाँच होणार OnePlus 9, OnePlus 9 Pro
Flipkart Carnival Sale सुरु, स्मार्टफोन्सवर बम्पर डिस्काऊंट, आयफोनवर 10000 रुपयांची सूट
Jio युजर्ससाठी खुशखबर! IPL चे सामने मोफत पाहता येणार
(Moto G30 and Moto G10 Power launched ind India, know price and feature)