मोटोरोलाचा स्वस्तातला 5G फोन, 50MP चा कॅमेरा, किंमत तर पाहा किती ?
ज्यांना कमी किंमतीत चांगले फिचर असलेला स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी मोटोरोला कंपनीचा स्मार्टफोनचा चांगला पर्याय आहे. या स्मार्टफोनचा फ्लिपकार्टवर सेल सुरु आहे.
जर तुम्ही कमी किंमतीत बेस्ट फिचर असणारा फोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या स्मार्टफोन फेस्टिव्ह डेज सेलमध्ये तुम्हाला 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेजचा तगडा मोटोरोलाचा फोन विकत घेण्याची संधी आली आहे. Motorola G45 5G या फोनला तुम्ही बेस्ट डीलमध्ये विकत घेऊ शकता.या फोनची किंमत 11,999 रुपये आहे. या फोनला खरेदी करण्यासाठी एक्सिस बॅंक किंवा IDFC बॅंकेचे क्रेडिट कार्डवरुन EMI ट्राझेक्शन केले तर एक हजार रुपयांचे डिस्काऊंट देखील मिळणार आहे.त्यामुळे 11 हजारात हा फोन विकत घेण्याची संधी आली आहे.
जर तुमच्याकडे फ्लिपकार्ट एक्सिस बॅंकचे कार्ड आहे तर तुम्हाला 5 टक्क्यांचा अनलिमिटेड कॅश बॅक मिळू शकतो. एक्स्चेंज ऑफर मध्ये हा फोन 11,300 पर्यंत मिळू शकतो. एक्स्चेंजवर मिळणारे डिस्काऊंट तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर तसेच ब्रॅंड आणि कंपनीच्या एक्चेंज पॉलिसीवर अवलंबून आहे. हा धमाकेदार सेल सात नोव्हेंबरपर्यंत फ्लिपकार्टवर सुरु रहाणार आहे.या फोनची वैशिष्ट्ये काय आहेत ती पाहूयात…
मोटोरोला G45 5G चे फिचर आणि स्पेसिफिकेशन काय ?
मोटोरोला कंपनीने या फोनमध्ये 720×1600 पिक्सेल रेझोल्युशन सह 6.5 इंचाचा एचडी + डिस्प्ले मिळणार आहे. फोनमध्ये ऑफर केलेला हा डिस्प्ले 120Hz चा रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्लेचा पिक ब्राइटनेस लेव्हल 500 निट्सचा आहे. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी फोनमध्ये गोरिल्ला ग्लास 3 देण्यात आलेला आहे. फोन मध्ये 8 जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेज देण्यात आलेले आहे. या फोनमध्ये स्नॅप ड्रॅगन 6s जेन 3 प्रोसेसर दिलेला आहे.
कॅमेरा आणि बॅटरी सपोर्ट
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये तुम्हाला एलईडी फ्लॅश सोबत ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहेय. यात 50 मेगा पिक्सलच्या मेन लेन्स सोबत एक 2 मेगा पिक्सलचा मॅक्रो कॅमेरा सामील आहेत. मोटोरोलाच्या या फोनमध्ये तुम्हाला 5000mAh ची बॅटरी दिलेली आहे. ही बॅटरी 18 वॅटचा फास्ट चार्जिंग सपोर्ट करत आहे. बायोमेट्रीक सिक्युरिटीसाठी या फोनमध्ये साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलेला आहे. या मोबाईल फोनमध्ये ओएस म्हणून एण्ड्रॉइड 14 वर बेस्ड MyUX वर काम करतो.