90Hz, 5000mAh बॅटरीसह Motorola Moto G Stylus 2022 लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
दीर्घ प्रतीक्षेनंतर, मोटोरोलाने (Motorola) अखेर मोटोरोला मोटो जी स्टायलस (Motorola Moto G Stylus) 2022 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन 90Hz रिफ्रेश रेट, 5000mAh बॅटरी, 6.8 इंचाच्या एलसीडी (LCD) डिस्प्लेसह येतो.
मुंबई : दीर्घ प्रतीक्षेनंतर, मोटोरोलाने (Motorola) अखेर मोटोरोला मोटो जी स्टायलस (Motorola Moto G Stylus) 2022 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन 90Hz रिफ्रेश रेट, 5000mAh बॅटरी, 6.8 इंचाच्या एलसीडी (LCD) डिस्प्लेसह येतो. हा स्मार्टफोन पूर्वी लॉन्च केलेल्या Moto G Stylus चं अपग्रेडेड व्हर्जन आहे. मोटोरोला मोटो जी स्टायलस 2022 मध्ये तीन सेन्सर्ससह ओवल शेप कॅमेरा आहे. स्मार्टफोनच्या बॅक पॅनलच्या मध्यभागी Motorola ब्रँडिंग आहे. डिस्प्लेमध्ये कोपऱ्यांवर पातळ बेझल्स आहेत. यात सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी पंच-होल कटआउटमध्ये फ्रंट कॅमेरा देखील आहे. फोन एका स्टायलससह येतो जो स्मार्टफोनमध्ये संग्रहित केला जाऊ शकतो.
भारतासह इतर देशांमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च केला जाईल की नाही हे मोटोरोलाने जाहीर केलेले नाही. मोटोरोलाने मागील स्टायलस सिरीज भारतात लॉन्च केली नव्हती ही बाब लक्षात घेता, मोटोरोला भारतात Moto G Stylus 2022 लाँच करेल की नाही याचा अंदाज लावता येत नाही.
मोटोरोला मोटो जी स्टायलस 2022 ची किंमत
Motorola Moto G Stylus 2022 हा फोन आधीच्या G Stylus च्या किंमतीतच लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 299 डॉलर्स (जवळपास 22,340 रुपये) इतकी निश्चित करण्यात आली आहे. Moto G Stylus 2022 युनायटेड स्टेट्समध्ये विकला जाईल. हा फोन मोटोरोलाची वेबसाईट, वॉलमार्ट, अमेझॉन, बेस्ट बाय आणि इतर वेबसाइटवरून खरेदी केला जाऊ शकतो.
Motorola Moto G Stylus 2022 चे स्पेसिफिकेशन्स
Motorola Moto G Stylus 2022 मध्ये सेंटरला पंच-होल कटआउटसह 6.8 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्ले 90hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. Moto G Stylus 2022 मध्ये MediaTek Helio G88 आणि Snapdragon 678 चिपसेट 4GB RAM आणि 64GB स्टोरेजसह सुसज्ज आहे.
शानदार कॅमेरा सेटअप आणि बॅटरी
या फोनच्या कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास Motorola Moto G Stylus च्या मागील बाजूस एक ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यामध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड आणि मॅक्रो लेन्ससह आणि 2 मेगापिक्सेल सेन्सरचा समावेश आहे. सेल्फीसाठी यात पुढच्या बाजूला 16 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. Moto G Stylus 2022 मध्ये 5000mAh बॅटरी आहे जी एकदा चार्ज केल्यावर दोन दिवस टिकते.
इतर बातम्या
सावधान | ऑनलाईन बँकिंग करत असाल तर जरा इकडे लक्ष द्या, आणि आधी तुमचं बँक अकाऊंट चेक करा…
7700 mAh बॅटरी, मोठा डिस्प्ले, Motorola Moto Tab G70 बाजारात, आजपासून विक्रीला सुरुवात
Free Fire Redeem Codes : ऑनलाईन गेमिंगमधून शानदार रिवॉर्ड्स, कसा करावा क्लेम?